धक्कादायक: शेजारी राहणाऱ्या पुरुषाचा शाळकरी मुलीवर लैंगिक अत्याचार...#Neighbor's man sexually assaults schoolgirl - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



धक्कादायक: शेजारी राहणाऱ्या पुरुषाचा शाळकरी मुलीवर लैंगिक अत्याचार...#Neighbor's man sexually assaults schoolgirl

Share This

खबरकट्टा/चंद्रपूर:

नागपूर : शाळकरी मुलीने पोटात दुखत असल्याची तक्रार केल्यानंतर आईने तिला रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी मुलगी 4 महिन्यांची गर्भवती असल्याचे सांगितले. कुणीतरी मुलाच्या प्रेमात पडल्याचा संशय आईला आला. मात्र, तिने शेजारी राहणाऱ्या 55 वर्षीय व्यक्तीकडून गर्भवती असल्याचे सांगताच आईच्या पायाखालची जमीन सरकली. महिलेने गर्भवती मुलीसह पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी तक्रारीवरून बलात्काराचा गुन्हा दाखल केला. संजय आत्माराम तायडे (52) असे आरोपीचे नाव आहे.

पीडित 15 वर्षीय मुलगी आईसह राहते. आई खासगी काम करते. त्यामुळे मुलगी नेहमी एकटी घरी असते. याच संधीचा फायदा घेऊन शेजारी राहणाऱ्या संजय तायडे यांची वाईट नजर मुलीवर होती. तो विनाकारण मुलीच्या घरी येऊन चहा-पाणी घेत होता. अनेकदा मुलीला बिस्कीट-चॉकलेट देऊन गोडीगुलाबी लावत होता. संजय हा एका कंपनीत काम करतो. त्याला पत्नी व दोन मुले आहेत.

वडिलासमान असलेला शेजारी हा नेहमी घरी ये-जा करीत असल्यामुळे मुलीच्या आईला कधीच त्याच्या वागणुकीवर संशय आला नाही. गेल्या जानेवारी महिन्यात १७ तारखेला मुलगी घरात कपडे बदलत होती. त्यावेळी संजय हा तिच्या घरी आला. त्याने मुलीला जवळ ओढले आणि अश्लील चाळे करायला लागला. त्याने मुलीला शारीरिक संबंधाची मागणी केली. मुलीने रडायला सुरुवात केली. मात्र, त्याने तिला मारहाण केली आणि तिच्यावर बलात्कार केला. आईला सांगितल्यास ठार मारण्याची धमकी दिली. मुलीच्या पोटात दुखत असल्याने तिने आईला सांगितले. आईने डॉक्टरकडे गेल्यानंतर ती तब्बल चार महिन्यांची गर्भवती असल्याचे निदान झाले. तिने संजय तायडे यांनी बळजबरी शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याची माहिती आईला दिली. या प्रकरणी बुटीबोरी पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली.



Pages