खबरकट्टा/चंद्रपूर:
जागतिक योग दिनाचे औचित्य साधून, चंद्रपूर शहरातील सर्व ज्येष्ठ नागरिक संघ, भारत स्वाभिमान, पतंजली योग समिती, किसान सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 18 ते 20 जून 2023 या तीन दिवसीय कालावधीत, विविध उपक्रम राबवून या वर्षीच्या जागतिक योग दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. या कालावधीत दररोज सकाळी योग प्राणायामचे शिबिर, योग प्रात्यक्षिक तथा तज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे.#khabarkatta chandrapur.
या तीन दिवसीय शिबिराचे माध्यमातून शास्त्रोक्त पद्धतीने योग प्राणायाम नियमित केल्यास त्यापासून मिळणारे लाभ जसे नकारात्मक विचार नष्ट होवून सकारात्मक विचार येणे, विविध असाध्य आजार जसे सर्दी, दमा, अस्थमा, अॅलर्जी, हृदयविकार, मधुमेह, ब्लडप्रेशर, किडनी, थॉयराईड, मूत्र विकार, मायग्रेन, डिप्रेशन, स्पाँडिलायसीस, चर्मरोग, वात विकार, लठ्ठपणा, महिलांचे विकार इत्यादी रोगांवर होणारे फायदे, इत्यादीचा सर्व सामान्य जनतेमध्ये प्रचार व प्रसार करणे हा या उपक्रमाचा / शिबिराचा प्रमुख उद्देश होय. तरी खाली दिलेल्या कार्यक्रम पत्रिकेनुसार तीन दिवसीय शिबिरात जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून शिबिराचा लाभ घ्यावा.#khabarkatta chandrapur
मार्गदर्शक
• श्री विजयराव चंदावार, अध्यक्ष भारत स्वाभिमान, चंद्रपूर जिल्हा श्री शरदजी व्यास, जिल्हा संगठक, पतंजली योग समिती, चंद्रपूर जिल्हा
सकाळी 5.30 ते 7.00दि. 18 ते 20 जून 2023 • योग प्राणायाम वर्ग- दि. 20 जून 2023 • योग स्थासह बाईक / स्कूटर रॅली - सायं. 4.00 वा.
स्थळ : ज्येष्ठ नागरिक संघ, रेव्हेन्यू कॉलनी, रामनगर, दाताळा रोड, चंद्रपूर