..अन् चक्क मुख्याधिकारी, नगराध्यक्षांच्या कक्षात फेकल्या मृत कोंबड्या...#and the dead chickens thrown in the room of the headmaster, mayor - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



..अन् चक्क मुख्याधिकारी, नगराध्यक्षांच्या कक्षात फेकल्या मृत कोंबड्या...#and the dead chickens thrown in the room of the headmaster, mayor

Share This
खबरकट्टा/चंद्रपूर:

गडचांदूर - करारनाम्यानुसार कंत्राटदार कार्य करीत नसून घंटागाडी वाहतूक वाहन व कचराकुंड्या अस्तावस्त पडल्या असून जमा केलेला घनकचरा इतरत्र कुठेही फेकल्या जात आहे जे कायदेशीर करारनाम्यानुसार चुकीचे आहे, मात्र मुख्य अधिकारी यांचे नियंत्रण नसल्यामुळे व याबाबत आरोग्य विभाग, व मुख्याधिकारी कधीच नगरात फेरफटका मारून आढावा घेत नाही आणि काढलेला गाळ घनकचरा सांडपाणी नियमित सफाई होत नाही व ज्या ठिकाणी गाळ काढून आहे ते पंधरा पंधरा दिवस उचल केल्या जात नाही, अनेक नाल्या सांडपाणी व केर कचऱ्यामुळे तुडुंब भरले असून यामुळे गावात डासांचा प्रादुर्भाव वाढला व गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. आठवडी बाजार परिसरात असणाऱ्या चिकन मार्केट मुळे परिसरात घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे.#khabarkatta chandrapur

याबाबत अनेकदा लेखी तसेच तुम्ही सूचना नगरपरिषद कर्मचाऱ्यांना दिल्या असताना सुद्धा नगरपरिषद कर्मचारी जाणून बुजून कानाडोळा करत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी स्वतःच्या परिसरातील घाण स्वतःच साफ करत तो संपूर्ण कचरा गडचंदूर नगरपरिषद कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या टेबलावर नेऊन फेकला.#khabarkatta chandrapur

Pages