चंद्रपुरातील रामसेतू पुलावर डीजेच्या वादावरून एकाची हत्या...#One killed due to DJ dispute on Ramsetu Bridge in Chandrapur - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



चंद्रपुरातील रामसेतू पुलावर डीजेच्या वादावरून एकाची हत्या...#One killed due to DJ dispute on Ramsetu Bridge in Chandrapur

Share This
खबरकट्टा/चंद्रपूर:

लग्नाच्या वरातीत डीजे वरून झालेल्या वादात एका मुलाला बेदम मारहाण करीत होते यामुळे त्याचे वडील सोडवायला गेले असता मारेकऱ्यांनी लोखंडी वस्तूने त्याच्या वडिलावर वार केला यात वडीला चा मृत्यू झाल्याची खलबळजनक घटना चंद्रपूर शहरातील रामसेतू उडाणपूलावर घडली.किशोर नत्थुजी पिंपळकर ( 48 )वर्ष, राहणार तिरवंजा, ता. भद्रावती असे मृतकाचे नाव असून ओम किशोर पिंपळकर (18 )वर्ष, रा. तिरवंजा, ता. भद्रावती असे जखमी मुलाचे नाव आहे.

दिनांक 15 जून 2023 रोजी बाबूपेठ येथील संदिप पिंपळकर यांचा लग्न सोहळा दाताळा मार्गावरील शोमॅन सेलिब्रेशन या ठिकाणी होता. वरातीत डिजे च्या तालावर नाचताना ओम पिंपळकर या युवकाशी वरातीतील काही अज्ञात मुलांचा वाद झाला. लग्न सोहळा आटोपल्यावर अज्ञात युवकांनी ओम पिंपळकर याला रामसेतू उड्डाणपूलावर अडवून मारहाण करणे सुरू केले याची माहिती ओम चे वडील किशोर पिंपळकर यांना मिळताच ते भांडण सोडवायला गेले असता अज्ञात मारेकऱ्यांनी त्यांचे डोक्यावर लोखंडी वस्तू ने जबर मारहाण केली यात किशोर पिंपळकर खाली कोसळले दरम्यान मारेकऱ्यांनी पळ काढला.#khabarkatta chandrapur 

जखमी अवस्थेत किशोर पिंपळकर व ओम पिंपळकर यांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले परंतु किशोर पिंपळकर यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नागपूर ला नेत असताना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला.#khabarkatta chandrapur

या घटनेची तक्रार रामनगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली पोलिसांनी गुन्हा दाखल करून हल्ला करणाऱ्या 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास रामनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेश मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोऊनी स्वप्नील गोपाले करीत आहेत

Pages