चंद्रपूर जिल्ह्यात पाच महिन्यांत रस्ते अपघातात 154 नागरिकांचा बळी...#154 civilians killed in road accidents in Chandrapur district in five months - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



चंद्रपूर जिल्ह्यात पाच महिन्यांत रस्ते अपघातात 154 नागरिकांचा बळी...#154 civilians killed in road accidents in Chandrapur district in five months

Share This
खबरकट्टा/चंद्रपूर :
जिल्ह्यात जानेवारी ते मे 2023 या पाच महिन्यांच्या कालावधीत 355 अपघाताच्या घटना घडल्या. यात 154 नागरिकांचा बळी गेला. विशेष म्हणजे, मागील वर्षीच्या तुलनेत रस्ते अपघातात 17 टक्क्यांनी घट झाली आहे.

जिल्ह्यातील अपघातांची संख्या व त्यात होणाऱ्या मृत्यूची संख्या कमी करण्यासाठी जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचे गठन करण्यात आले आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी पहिल्या पाच महिन्यांत अपघातांच्या घटनांसह मृत्यूंच्या संख्येत 29 टक्क्यांची घट झाली आहे. 2022 मध्ये जानेवारी ते मे या पहिल्या पाच महिन्यांत जिल्ह्यात 415 अपघात झाले होते. यावर्षी अपघातांची संख्या 355 आहे. अपघाताच्या संख्येत 17 टक्क्यांची घट झाली आहे. 2022 मध्ये याच कालावधीत 218 जणांचा मृत्यू झाला होता. 2023 मध्ये मृत्यूचा आकडा 154 आहे. मृत्यूच्या संख्येत 29 टक्के घट झाली असून गतवर्षीच्या तुलनेत 64 लोकांचे जीव वाचले आहेत.#khanarkatta chandrapur

तसेच जानेवारी ते मे या कालावधीत 2022 मध्ये ‘ड्रंक ॲन्ड ड्राईव्ह’चे 216 प्रकरण दाखल करण्यात आले होते. 2023 मध्ये ही संख्या 3817 वर गेली आहे.2022 मध्ये ‘सिटबेल्ट’ न लावल्याबद्दल 4608 प्रकरण, 2023 मध्ये ही संख्या 10276 वर, गतवर्षी हेल्मेट न घालणे 7099 प्रकरण, 2023 मध्ये 15668 प्रकरण तसेच 2022 मध्ये एकूण मोटर वाहन प्रकरणाची संख्या 41706 होती. यावर्षी पहिल्या पाच महिन्यांत ही संख्या 56556 वर गेली आहे.#khanarkatta chandrapur

Pages