पत्नीच्या गळ्यावर पतीचा ब्लेडने वार...#Husband stabs his wife with a blade - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



पत्नीच्या गळ्यावर पतीचा ब्लेडने वार...#Husband stabs his wife with a blade

Share This
खबरकट्टा/चंद्रपूर :



आपल्या माहेरी गेलेल्या पत्नीला घरचे पैसे सोबत नेल्याचे रागात सासुरवाडीला जाऊन पतीने पत्नीच्या गळ्यावर ब्लेडने वार केला, Crime यात पत्नी गंभीर जखमी झाली असून चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.#khabarkatta chandrapur 

विरूर पोलीस स्टेशन हद्दीतील राजूरा तालुक्यातील अन्नूर या गावातील जोगेश्वर गणपत सिडाम याचा 2020 साली नवेगाव येथील रोशनी सोबत प्रेमविवाह झाला, दोघेही अन्नूर येथे राहत होते.
जोगेश्वर अति मद्यप्राशन करू लागला यामुळे त्याची पहिली पत्नी सोडून गेली नंतर जोगेश्वर याने दुसरा विवाह केला तर दुसरी पत्नी रोशनी ही सुद्धा जोगेश्वर च्या अति मद्यप्राशनामुळे त्रासून माहेरी निघून गेली.#khabarkatta chandrapur 


दिनांक 11 जून रोजी जोगेश्वर पत्नीच्या माहेरी गेला आणि घरचे पैसे आणल्याचा कारणावरून वाद घालू लागला. दरम्यान पत्नी रोशनी ने आपत्कालीन पोलीस क्रमांक 112 वर संपर्क साधून पोलीसांना घटनाक्रम सांगितला, पोलीस तक्रार केली म्हणून रागाच्या भरात जोगेश्वर ने पत्नीच्या गळ्यावर ब्लेडने जबर वार केला.#khabarkatta chandrapur 


विरूर पोलीस स्टेशन चे ठाणेदार सपोनि जयप्रकाश निर्मल यांना घटनेची माहिती मिळताच आपल्या पोलीस पथकासह घटनास्थळी पोहोचले असता पत्नी रोशनी गंभीर जखमी अवस्थेत होती, पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता जखमी रोशनीला राजूरा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले, प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला, रोशनीला जिल्हा सामान्य रुग्णालयात पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे.

पीडित महिला रोशनी च्या बयानावरून गुन्हा दाखल करून आरोपी पती जोगेश्वर सिडाम याला विरूर पोलिसांनी अटक केली.

पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जयप्रकाश निर्मल, पोऊनी सचिन मडावी, पोहवा माणिक वाग्धरकर, भुजंगराव कुलसंगे, मलेश नर्गेवार, भगवान मुंडे, स्वप्नील चांदेकर, अतुल शहारे आणि विरूर पोलीस स्टेशनचे पथक करीत आहेत.


Pages