खबरकट्टा/चंद्रपूर:
शेतीसाठी लागणारे भांडवल शेतकरी सेवा सहकारी संस्थेतुन पीक कर्जाचे रूपाने उभे करतो. मात्र जिल्हा बॅंक आणि शासनाचे चुकीच्या धोरणांमुळे या संस्थाना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने त्यांचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. या अनुषंगाने चंद्रपुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेला अनेकदा पत्र दिले, बॅंक प्रषासनाचे लक्ष वेधले. परंतु अ़द्याप यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही. नुकताच जिल्हा बॅंकेने बाजार समितीचे सभापतींचा सत्कार व सहकार मेळावा आयोजित केला. या कार्यक्रमाला अपेक्षित गर्दी जमवण्यासाठी सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष व संचालकांना आवर्जुन निमंत्रित केल्या गेले. मात्र राजकीय पदाधिकारी मोक्याच्या खुर्च्यात बसल्याने निमंत्रित सहकारातील कार्यकर्त्यांची गैरसोय झाली. शिवाय सेवा सहकारी संस्थांचे कोणत्याही समस्या किंवा त्यावरील उपाय योजनांबाबत यावेळी तज्ञांशी चर्चा झाली नाही.#khabarkatta chandrapur
सेवा सहकारी सोसायटीच्या शेअर्स धारक सभासदाचे मृत्यु पश्चात किंवा स्वेच्छेने सदस्यत्व सोडल्यावर त्याचे शेअर्सची रक्कम बॅंकेने परत करावी. जिल्हयातील सेवा सहकारी संस्थांचे कोटयावधींचे शेअर्स बॅंकेकडे बिनव्याजी जमा आहे, त्यावर लाभांषही मिळत नाही. बॅंक मात्र या रकमेवर व्यवहार करून नफा मिळवते. सोसायटीची बॅंकेकडे जमा असलेली शेअर्सची रक्कम आणि प्रत्यक्षात संस्थेच्या रेकाॅर्ड वर असलेली रक्कम यातील तफावत बॅंकेने संस्थेचे सचिवाला सोबत घेऊन अद्ययावत करावी. बॅंकेच्या एकुण कर्जबाकीच्या 10% शेअर्स रक्कम मर्यादा पुर्ण झाल्यानंतर संस्थेकडे नव्याने येणारी हिस्से रक्कम बॅंकेने कर्जात कापुन घेऊ नये. थकीत सभासदाकडुन वसुली करतांना नियमानुसार मुद्यल रकमे पेक्षा अधिक व्याज सोसायटी संबंधित शेतक-याकडून घेऊ शकत नाही. परंतु बॅंक मुद्यल रकेमेपेक्षा जास्त व्याज संस्थेकडुन वसूल करते. 2017 व 2019 चे कर्जमाफी मधील संस्थेच्या आलेल्या व्याजामधुन 2% व्याज गाळा रक्कम संस्थेला देण्यात यावी. नवीन सभासद करताना संस्थेचे कार्यक्षेत्रातील परंतु सध्या बाहेर रहात असेल तरीही सर्वांना परीचीत असलेल्या व्यक्तीला सभासद करण्यास मान्यता देण्यात यावी.#khabarkatta chandrapur
संस्थेला मिळणारी व्याजातील 2%रक्कम विनाविलंब मिळावी किंवा वसुलीतुन कपात करण्याची परवानगी मिळावी. थकबाकी असलेल्या शेतक-यांचे कर्ज बॅंकेने सदर शेतक-यांना विश्वासात न घेता परस्पर रूपांतरीत केल्यामुळे हजारो शेतक-यांना कर्जमाफी योजनेचा पुर्ण लाभ मिळु शकला नाही. यात शेतक-यांची कोणतीही चुक नसल्यामुळे यावर पुर्नविचार करून कर्जमाफी योजनेचा अशा शेतक-यांना लाभ देण्यात यावा आदी मागण्यांवर चर्चा करून त्या निकाली काढण्यासाठीही बॅंक प्रशासनाने एखादा कार्यक्रम घ्यावा अशी मागणी राजूरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक उमाकांत धांडे यांनी केली आहे.#khabarkatta chandrapur

