माझ्या कार्याची सुरुवातच काशीनाथ महाराजांच्या पावन भूमीतुन झाली. या गावातील नागरिकांनी मला मतरूपी आर्शिवाद दिला. श्री संत काशीनाथ महाराज हे येथील श्रद्धास्थान आहे. त्यांचे चंद्रपूर जिल्ह्यात मोठे भाविक आहे. या मंदिरास तीर्थक्षेत्र 'क' वर्गाचा दर्जाही प्राप्त झाला आहे. या तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी कधीच निधी कमी पडु देणार नाही, असे आश्वासन जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.#khabarkatta chandrapur
उसेगाव येथे संत काशीनाथ महाराजांच्या शताब्दीवर्षानिमित्त नवीन मूर्तीची प्राणप्रतिष्ठा, दर्शन सोहळा पार पडला. त्याप्रसंगी ते उदघाटक म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उसेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच निविता ठाकरे होत्या. याप्रसंगी आमदार किशोर जोरगेवार, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराव भोंगळे, जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे, विवेक बोढे, उज्जवला प्रेमानंद जोगी, वर्षा ताजने, स्वामी चैतन्य महाराज, देवस्थानाचे अध्यक्ष पांडुरंग वासेकर ,पोलिस पाटील नरेंद्र बुच्चे, चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक पारस पिंपळकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. याप्रसंगी आमदार किशोर जोरगेवार,ब्रिजभूषण निविता ठाकरे यांच्यासह अन्य मान्यवरांची भाषणे झाली. संत काशीनाथ महाराजांच्या शताब्दी वर्षानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम गावात पार पडले.#khabarkatta chandrapur
शेकडो भाविकांची यावेळी उपस्थिती होती. याच कार्यक्रमात उसेगाव येथील करिश्मा पांडुरंग वासेकर हिची स्पर्धा परीक्षेतून नायब तहसीलदार पदी नियुक्ती झाली. त्याबद्दल तिचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. अलका दीपक ठाकरे याँना डॅाक्टरेट मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक स्वामी चैतन्य महाराजांनी केले. या कार्यक्रमाचे संचालन डॅा. अलका दीपक ठाकरे यांनी, तर आभार मुंगोलीचे सरपंच अॅड. रुपेश ठाकरे यांनी मानले.बाळकृष्ण ठाकरे ,नामदेवठाकरे,आनंदराव देरकर,प्रा.अनिल ठाकरे ,पुरुषोत्तम राजुरकर ,मनोज देरकर ,अरविंद ठाकरे ,भानुदास अतकारे ,कैलाश देरकर ,केशव काळे ,महेश बाकडे ,प्रफुल वासेकर ,संदीप ठाकरे ,मंगला आवारी ,सुनीता बावने ,सुरेखा काळे ,ज़ुली मुन ,शोभा ठावरी ,वीठा देरकर ,शीला ठाकरे यांनी सहकार्य केले.#khabarkatta chandrapur

