खबरकट्टा/चंद्रपूर:
बल्लारपूर तालुक्यातील कोठारी येथील एक शेतकरी उन्हात स्लॅब वर गेला असता त्याला तेवढ्यात चक्कर आली. व खाली येऊन पडल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. कोठारी येथील शेतकरी खुशाब महादेव पिदूरकर वय 48 हे भरदुपारी 2.30 वाजताच्या सुमारास स्वतः च्या घराचे स्लॅबवर गेले असता अतिउष्णतेमुळे चक्कर आली. यादरम्यान स्लॅबवरून खाली पडून त्यांचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी 16 मे ला घडली. त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागून त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात वयोवृद्ध आई, पत्नी, मुलगा व मुलगी असून घरातील कर्ता पुरुष गेल्याने कुटुंबासमोर दुःखाचा डोंगर उभा ठाकला आहे.#khabarkatta chandrapur
खुशाब शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. त्याच्या अचानक मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत असून कोठारी गावात शोककळा पसरली आहे. सध्या राज्यात उष्णतेची लाट आली असून, विदर्भात चंद्रपूरसह काही जिल्ह्यात तापमान वाढण्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला होता. चंद्रपूर जिल्ह्यातील तापमान 43 अंशा चा वर पोहोचले आहे. राज्यातील विदर्भ, खानदेश या प्रदेशात उष्णतेचा पारा वाढतच आहे. हे तापमान आणखी काही दिवस राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी भर उन्हात फिरू नये व स्वतःची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.#khabarkatta chandrapur
