चंद्रपूर जिल्हयात चार महिन्यात प्राणांकित अपघातामध्ये 30% नी घट...#30% reduction in fatal accidents in four months in Chandrapur district - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



चंद्रपूर जिल्हयात चार महिन्यात प्राणांकित अपघातामध्ये 30% नी घट...#30% reduction in fatal accidents in four months in Chandrapur district

Share This
खबरकट्टा/चंद्रपूर:

चंद्रपूर जिल्हा पोलिसांनी (ड्रंक अँड ड्राईव्ह, सीट बेल्ट, विना हेल्मेट ) ही त्रिसूत्री मोहीम राबवल्याने सन 2022 चे तुलनेत सन 2023 मधील चार महिन्यात प्रामुख्याने प्राणांकित अपघाताचे प्रमाण 30 टक्के वर आणण्यात यश मिळवले आहे.

सन 2022 मध्ये जानेवारी ते एप्रिल या कालावधीत एकूण 332 रोड अपघात होते पैकी केवळ प्राणांकित अपघात 155 व 171 व्यक्तींना प्राण गमवावे लागले. त्या तुलनेत सन 2023 मध्ये मागील चार महिन्यात एकूण अपघात 281 असून प्राणांकित अपघाताची संख्या केवळ 109 आहे त्यात 119 मयात झाले आहेत. प्रभावी त्रिसूत्री कार्यवाही व चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिक है। वाहतूक नियम पालन करीत असल्याने प्राणांकित अपघातात 30% नी उल्लेखनीय घट झालेली आहे.#khabarkatta chandrapur

रोड अपघातावर नियंत्रण आणण्यासाठी चंद्रपूर जिल्हा पोलिसांकडून दररोज (ड्रंक अँड ड्राईव्ह, सीड बेल्ट, विणा हेल्मेट ) ही त्रिसूत्री मोहीम मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत आहे. तेव्हा मध्य प्राशन करून सीट बेल्टचा वापर न करता तसेच हेल्मेट परिधान न करता वाहन चालवू नये असे आव्हान पोलीस अधीक्षक यांनी केले आहे.#khabarkatta chandrapur


Pages