खबरकट्टा/चंद्रपूर:
राजीव गांधी नगर येथे दहा वर्षापासून वास्तव्यास असलेली वंदना दिनेश खोरवाल हिला घराशेजारी राहणाऱ्या व्यक्तीकडून घर खाली करण्यासाठी वारंवार जीवे मारण्याची धमकी दिली जात असून जातीवाचक अवाच्छ शब्दातशिवीगाळ केली जात असल्याचा आरोप पीडित महिलेने पत्रकार परिषदेतून केला आहे. दोन दिवसापासून पोलिस ठाण्यात सतत हेलपाटा घालवल्यानंतर त्या आरोपीवर गुन्हा दाखल केला. मात्र लगेच त्याला आणून सोडून दिले . यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
आरोपीला सोडून दिल्याने आमच्या जीविता धोका असल्याचा आरोप पीडीतीने महिलेने केला आहे.#khabarkatta chandrapur
ही महिला आपल्या दोन मुलींना घेऊन सदर घरी राहत असून या महिलेने पहिले पती सोडून दुसऱ्या पतीसोबत लग्न केले आहे. दुसरा पती हा कामानिमित्त बाहेरगावी राहतो. ती एकटीच राहत असल्याचा फायदा घेऊन घराशेजारीच राहणाऱ्या समीर अब्दुल सत्तार हा पिढी तिच्या घरी घर खाली करण्यासाठी वारंवार त्रास देत असल्याची तक्रार रामनगर पोलीस ठाण्यात केली. तिने पोलीसात दिलेल्या तक्रारीत वारंवार माझ्या छातीला बंदूक लावून जीवे मारण्याची धमकी देत असून घाणेरड्या शब्दात शिव्या देत असल्याचे आरोप केला आहे. या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र थातूरमातूर चौकशी करून आरोपी समीर सतार या गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीला पोलिसांनी शह दिला असून उलट आरोपी तू कुठे गेलीस तरी माझे काहीच कोणी वाकडे करू शकत नाही अशा प्रकारचा दम देतो .आणि नेहमी मला मारण्याची धमकी देतो. माझ्या जीवाला धोका असून अशा गुंड प्रवृत्तीच्या माणसावर कठोर कारवाई करण्याची मागणी पीडितेने पत्रकार परिषदेतून केली आहे. हा स्वतःच तडीपार असल्याचे सांगतो.#khabarkatta chandrapur
त्याच्याकडे बंदुकी सारखे शस्त्र असल्याचे पीडीतिने भयानात सांगितले मात्र. आरोपीला दोन दिवसाचा कालावधी मिळाल्याने त्याच्या घराची साधी झडती पोलिसांनी घेतली नसल्याने त्याच्याकडील असलेले शस्त्र यामुळे भविष्यात माझ्या जीवित धोका असून त्याला तत्काळ अटक करून कारवाई करण्याची मागणी पीडित महिलेने केली आहे.#khabarkatta chandrapur

