चंद्रपूर महानगरपालिकेत कर्मचारी भरती; तब्बल इतका मिळेल पगार...#Recruitment of employees in Chandrapur Municipal Corporation; You will get a lot of salary - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



चंद्रपूर महानगरपालिकेत कर्मचारी भरती; तब्बल इतका मिळेल पगार...#Recruitment of employees in Chandrapur Municipal Corporation; You will get a lot of salary

Share This
खबरकट्टा/चंद्रपूर:

चंद्रपूर महानगरपालिकेत विविध रिक्त पदे भरण्यासाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही पदानुसार वेगवेगळी असणार आहे. उमेदवाराने पदानुसार अर्ज ऑफलाइन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर 25 मे 2023 रोजी सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत खाली दिलेल्या पत्त्यावर नमूद करायचे आहेत.

यामध्ये काही पदांच्या थेट मुलाखती देखील होणार आहे, त्यासाठी उमेदवारांनी या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराचे वय कमीत कमी 18 वर्षे ते जास्तीत जास्त 60 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे, भरती प्रक्रिया दरम्यान ज्या ज्या उमेदवारांना बोलविण्यात येईल त्या त्या वेळी त्यांना स्वखर्चाने उपस्थित राहावे लागेल. सदर उपस्थिती करिता कोणतेही मान अथवा प्रवास खर्च दिला जाणार नाही.#khabarkatta chandrapur

चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवासी असल्यास प्राधान्य देण्यात येईल, उमेदवारांना शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे महाराष्ट्र नागरी सेवेचे नियम लागू राहणार नाहीत, तसेच त्यांना भविष्यात कायम नोकरीचा दावा देखील करता येणार नाही. उमेदवाराने कामावर रुजू होण्यापूर्वी शंभर रुपयाचे स्टॅम्प पेपरवर विहित नमुन्यात करारनामा करुन द्यावा लागेल.#khabarkatta chandrapur

पात्र-अपात्र उमेदवारांची यादी व मुलाखतीचा दिनांक चंद्रपूर मनपाच्या संकेतस्थळावर तसेच आरोग्य विभाग, तिसरा माळा, चंद्रपूर महानगरपालिका येथे 06 जून 2023 रोजी उपलब्ध होईल.#khabarkatta chandrapur

चंद्रपूर महानगरपालिकेत विविध रिक्त पदे भरण्यासाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे,या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही पदानुसार वेगवेगळी असणार आहे. उमेदवाराने पदानुसार अर्ज ऑफलाइन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर 25 मे 2023 रोजी सायंकाळी 5.00वाजेपर्यंत खाली दिलेल्या पत्त्यावर नमूद करायचे आहेत.


Pages