खबरकट्टा/चंद्रपूर:
गेल्या काही महिन्या पासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना हेतुपुरस्सपर खोट्या गुन्ह्यात ED ची नोटीस पाठवून त्रास देणे सुरु आहे. ह्यातच अनिल देशमुख, नवाब मलिक ह्यांच्या विरोधात कोणतेही पुरावे नसताना त्यांना अटक करण्यात आली होती.#khabarkatta chandrapur
गेल्या काही महिन्या पासून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष आमदार जयंत पाटील हे भाजपा आणि सरकार विरोधात जनतेच्या मध्ये भूमिका मांडत होते ह्यामुळे जयंत पाटील ह्यांच्या विरोधात द्वेष भावनेने ED ची नोटीस पाठवून दिनांक 22/5/23 ला ED कार्यालयात चौकशी साठी बोलवण्यात आले.#khabarkatta chandrapur
या हुकूमशाहीचा निषेध म्हणून आज दिनांक 22/5/23 ला राष्ट्रवादी युवक कांग्रेस चंद्रपूर शहर च्या वतीने इ डी आणि भा ज पा च्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस चे शहर जिल्हा अध्यक्ष राजीव कक्कड आणि युवक शहर अध्यक्ष अभिनव देशपांडे ह्यांच्या नेतृत्वात निषेध आंदोलन करण्यात आले, यावेळी भाजपा व इडी विरोधात घोषणा देण्यात आल्या.
निषेध आंदोलन वेळी विधानसभा अध्यक्ष सुनील काळे, माजी सरपंच अमोल ठाकरे, शहर उपाध्यक्ष कुमार पॉल, निसार शेख, राहुल देवतळे, संभाजी खेवले, युवक राष्ट्रवादी चे राहुल वाघ, केतन जोरगेवार, मनोज सोनी, संजय बिस्वास, नदीम शेख, विजय राऊत, अक्षय सगदेव, प्रेमकांत तेमबुरकर, स्वप्नील गेडाम बब्बू भाई इसा, अमित गावंडे, पियुष सहारे, प्रेम परचाके, सुधीर कोयला, तुषार वेट्टी, राहुल भगत, पियुष चांदेकर, शालीक भोयर, राज खोब्रागडे, पंकज मेंढे, तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.#khabarkatta chandrapur

