खबरकट्टा/चंद्रपूर:
कोरपना - कोरपना तालुक्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती झिबल पाटील जुमनाके ( 75) यांचे मंगळवार पहाटेला मांडवा येथील त्यांचे राहते घरी निधन झाले.#khabarkatta chandrapur
जुमनाके यांचे राजकीय क्षेत्रासह सामाजिक ,शैक्षणिक, आरोग्य विषयक कार्यात भरीव योगदान राहले आहे.
ग्रामपंचायत सरपंच पदापासून जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण व आरोग्य सभापती पदापर्यंतची धुरा त्यांनी यशस्वीरित्या सांभाळली. मांडवा गावचे सरपंच , दहा वर्ष आदिवासी सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष, दोनदा जिल्हा परिषद सदस्य अशी अनेक पदे त्यांनी त्यांच्या राजकीय कार्यकीदींत भूषवली. तसेच कोरपना येथील ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक सहसचिव होते.#khabarkatta chandrapur

