शंकरपूर (चंद्रपूर) : शासनाकडून एका कुटुंबाला घरकुल मंजूर झाले. मात्र, नमुना आठ अ नुसार जागेची मालकी व कर आकारणी नसल्याच्या कारणावरून घरकुल रद्द केल्याने त्या कुटुंबाने चक्क ग्रामपंचायतीतच बिऱ्हाड मांडल्याचा धक्कादायक प्रकार हिरापूर येथे मंगळवारी घडला. दरम्यान, न्याय मिळेपर्यंत हटणार नाही, असा इशारा या कुटुंबाने दिल्याने ग्रामपंचायतचे पदाधिकारी पेचात पडले आहेत.#khabarkatta chandrapur
हिरापूर येथील नूतन गोमा दडमल हे आपल्या आई-वडिलांच्या जुन्या घरात राहतात. त्या घराची मालकी आईच्या नावाने असून, गृहकर पावतीही आहे. नूतन दडमल यांना घरकुल मंजूर करण्यात आले. घरकुलासाठी पुढील कार्यवाही करण्याच्या दृष्टीने लाभार्थीला नमुना आठ अ नुसार जमीन मालकी सिद्ध करावी लागले. दडमल यांच्या नावाने ग्रामपंचायतमध्ये कर आकारणी उपलब्ध नाही. ही आकारणी नसल्याने मंजूर घरकुल ग्रामपंचायतने रद्द केले. ग्रामपंचायत आईच्या नावाने सुरू असलेले गृहकर घेत आहे. ही जागा आईची असल्याने तिला तरी घरकुल द्यायला पाहिजे. मात्र, ग्रामपंचायतीने मंजूर घरकुल हेतुपुरस्सर रद्द केले, असा आरोप नूतन दडमल यांनी केला आहे.#khabarkatta chandrapur
इतक्या वर्षांपासून आम्ही येथील रहिवासी असून, आईच्या नावाने गृहकर पावती असताना कर आकारणी का नाही ? ग्रामपंचायत रेकार्डवर आकारणीमध्ये नाव नाही आणि नवीन कर आकारणी ग्रामपंचायत देत नाही. त्यामुळे घरकुलाअभावी राहायचे कुठे, असा प्रश्न करत नूतन दडमल यांनी पत्नी, तीन मुले व संसारोपयोगी साहित्य घेऊन मंगळवारी ग्रामपंचायतीच्या वऱ्हाड्यात बिऱ्हाड मांडले आहे. लक्ष्मी नाजूक ननावरे यांचेही नाव घरकुल यादीत आहे. पण, त्यांच्या घराची कर आकारणी नाही. ग्रामपंचायतीला कर आकारणीसाठी अनेकदा अर्ज केला. संबंधित वरिष्ठ अधिकारी यावर तोडगा काढणार काय, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.#khabarkatta chandrapur

