राज्य शासनाने परवाने मंजूर करताना दारू दुकानांसाठी नियमावली निर्धारित करून दिली आहे. परंतु, शहरातील अनेक दारू दुकानदारांकडून नियमांचे सर्रासपणे उल्लंघन केले जात आहे. मात्र, राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकारी, कर्मचारी केवळ अर्थपूर्ण मैत्री जपण्यात धन्यता मानताना दिसत असल्याचा आरोप करत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दारू दुकानांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांनी केली आहे. यासंबंधीचे निवेदन चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले आहे.#khabarkatta chandrapur
दारूविक्रेत्यांनी जिल्ह्यातील बंदी उठविल्यानंतर पुन्हा आपला व्यवसाय सुरू केला आहे. परंतु, अनेक दारू दुकानदार शासकीय नियमांचे उल्लंघन करताना दिसत आहेत. देशी दारू, वाईन शॉप, बिअर शॉपी अणि बिअर बार हे निर्धारित वेळेआधीच सुरू केले जात आहेत. तर रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवली जात आहेत. अनेक बिअर शॉपी मालकांनी ग्राहकांना दारू पिण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करून दिली आहे. वाईन शॉपजवळील हातठेल्यांवर खुलेआमपणे मद्य प्राशन करू दिले जात आहे. परमिट रूममध्ये 18 वर्षापेक्षा कमी वयोगटातील नागरिकांना प्रवेशनाही, असे एकाही बारमध्ये फलक नाही. अनेक दुकानांना पार्किंगची नसल्याने ग्राहक रस्त्यावर वाहने उभी करतात, त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होत आहे. मात्र, दारू दुकानदारांचे याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष होता असल्याचा आरोपही निवेदनातून केला यावेळी रामू तिवारी, प्रवीण पडवेकर अश्विनी खोब्रागडे, सुभाष जुनघरे कुणाल चहारे, नौशाद शेख आदी उपस्थित होते.#khabarkatta chandrapur

