दारूची लत सुटण्यासाठी घेतली जडीबुटी, आणि थोड्याच वेळात…#Took herbs to cure alcohol addiction, and soon - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



दारूची लत सुटण्यासाठी घेतली जडीबुटी, आणि थोड्याच वेळात…#Took herbs to cure alcohol addiction, and soon

Share This
खबरकट्टा/चंद्रपूर:

दारूबंदी असलेल्या वर्धा जिल्ह्यात दारूचे व्यसन जडलेल्या व्यक्ती गावोगावी सापडतात.संसार उध्वस्त होतात म्हणून व्यसनमुक्ती केंद्र सुरू करण्याची मागणी स्वयंसेवी संस्था सातत्याने करतात.असे काही नसल्याने व्यसनी व्यक्तीचे कुटुंब आपापल्या परीने उपाय करण्याचा प्रयत्न करतात.त्यात घातही होतो,याचा पुरावाच पुढे आला आहे.#khabarkatta chandrapur 

समुद्र्पुर तालुक्यातील झुणका येथील मंगेश दामोधर जामूनकर या चाळीस वर्षीय इसमास दारूचे व्यसन जडले होते. पंधरा वर्षांपासून दारू पिणे सुरू असल्याने कुटुंब त्रस्त झाले होते. त्यालाही दारू पासून सुटका करायची असल्याने त्याने उपाय शोधणे सुरू केले. त्यात त्याला एका परिचित व्यक्तीने पारंपरिक सल्ला दिला. आयुर्वेदातील औषधी सांगितली. ही जडीबुटी उपयोगी ठरेल म्हणून त्याने औषधी घेतली. मात्र काही क्षणातच मंगेशची तब्येत बिघडली. घाबरलेल्या लहान भाऊ सचिन याने त्यास सेवाग्रामच्या रुग्णालयात दाखल केले.पण उपचारादरम्यान मंगेशचे निधन झाले.#khabarkatta chandrapur 

गिरड पोलीस या प्रकरणी तपास करीत आहे.जडीबुटी सांगणारा अद्याप पुढे आला नाही.


Pages