कोरपना - गडचांदुर कडून आदिलाबाद कडे जाणाऱ्या ट्रक चा टायर फुटल्याने समोरून येत असलेल्या तेलंगणा परिवहन च्या बसला समोरासमोर जबर एकमेकाला ठोस बसल्याने दोन्ही वाहनाचे वाहनचालक गंभीर रित्या जखमी झाल्याची घटना कोरपना - चंद्रपूर राष्ट्रीय महामार्ग वरील कातलाबोडी फाटा येथे बुधवारी दुपारी बारा वाजता च्या सुमारास घडली.#khabarkatta Chandrapur
प्राप्त माहितीनुसार, गडचांदुर येथून के टी सी कंपनीचा मालवाहू ट्रक क्रमांक एम एच 34 पी जी 4166 हा आदिलाबाद कडे जात असताना कातलाबोडी फाट्याजवळ त्याचा टायर फुटला.त्यात अनियंत्रित होऊन दरम्यान आदिलाबाद कडून चंद्रपूर कडे जाणाऱ्या तेलगणा परिवहनच्या बस क्रमांक ए पी 01 झेड 0083 ला जबर समोरासमोर धडक बसली.यात दोन्ही वाहनाचे वाहनचालकाच्या पायाला गंभीर रित्या इजा पोहचली. त्यांच्यावर कोरपना येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचाराथ चंद्रपूर येथे रेफर करण्यात आले आहे. या दरम्यान चंद्रपूर - आदिलाबाद राष्ट्रीय महामार्ग वरील काही वेळ वाहतूक खोळंबली होती. नंतर पोलिसांनी रस्ता मोकळा करून एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली. घटनेचा पुढील तपास ठाणेदार संदीप एकाडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी नामदेव पवार व कोरपना पोलीस करीत आहे.
