'त्या' बाबुपेठच्या उड्डाणपुलावर पुन्हा एक भिषण अपघात - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



'त्या' बाबुपेठच्या उड्डाणपुलावर पुन्हा एक भिषण अपघात

Share This
खबरकट्टा/चंद्रपूर: :

शहरातील बाबूपेठ परिसरातील राजीव गांधी इंजिनिअरिंग कॉलेज ते लालपेठ – बल्लारपूर जाणाऱ्या मार्गावरील उडानपुलावर दिनांक 11 एप्रिल रोजी रात्री आठ ते नऊ च्या सुमारास एका दुचाकी चालकाचा भीषण अपघात झाला यात दुचाकीवर बसलेला इसम चक्क पुलावरून खाली कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे.#khabarkatta chandrapur

बाबूपेठ परिसरातील उड्डाणपुलावर भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकी चालकाचे नियंत्रण सुटल्याने दुचाकीने वळणावर चक्क उड्डाणपुलाच्या कटघऱ्याला जोरदार धडक दिली यात दुचाकी वर मागे बसलेला इसम उड्डाणपुलाखाली कोसळला या अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले असून सामान्य रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आल्याची माहिती आहे.#khabarkatta chandrapur

या मोपेड दुचाकी वाहनाला मागेपुढे कुठेही नंबर प्लेट नाही. काही महिन्याआधी याच उड्डाणपुलावर याच ठिकाणी एक चारचाकी वाहन (कार) कोसळून भिषण अपघात घडला होता, यात 4 युवक प्रवासी होते व एकाचा मृत्यू झाला होता.#khabarkatta chandrapur

Pages