दबा धरून बसलेल्या वाघाने केला महिलेचा मृतदेह बघणाऱ्या नागरिकांवरही हल्ला...#The tiger sitting on the ground attacked the citizens who saw the dead body of the woman - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



दबा धरून बसलेल्या वाघाने केला महिलेचा मृतदेह बघणाऱ्या नागरिकांवरही हल्ला...#The tiger sitting on the ground attacked the citizens who saw the dead body of the woman

Share This
खबरकट्टा/चंद्रपूर:

सावली पासून 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या वाघोली बुट्टी येथील ममता हरिश्चंद्र बोदलकर वय 65 वर्ष ही महिला आपल्या शेतात काम करण्यासाठी गेली असता दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करून तिला जागीच ठार केल्याची घटना घडली. सदर घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी गर्दी केली. महिलेला ठार केल्यानंतर वाघाने जवळच आपला दबा धरून ठेवला व अर्ध्या तासातच गर्दीतल्या लोकांच्या अंगावर आल्याने त्या लोकांपैकी गोवर्धन नामक व्यक्तीच्या पायाला जबर दुखापत झाली.

सावली वनपरिक्षेत्र अतिशय संवेदनशील क्षेत्र असून या परिसरात वाघ व बिबट यांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे जनमानसात वनविभागाबाबत प्रचंड आक्रोश निर्माण होत आहे. आजपर्यंत चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात एकूण54 बळी गेलेले आहेत, त्यापैकी सावली तालुक्यातील हा 21 वा बळी असून चंद्रपूर जिल्ह्याचा विचार करता एक तृतीयांश पेक्षा जास्त बळी एका सावली तालुक्यात गेलेले आहेत, ही गांभीर्याची बाब आहे मात्र याकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे.#khabarkatta chandrapur

मागील आठवड्यात चकविरखल येथील मंदा एकनाथ सिडाम हीचा वाघाने बळी घेतलेला होता.ही घटना ताजी असतानाच वाघाने पुन्हा एकदा एका महिलेचा बळी घेतला. वाघाने महिलेला ठार केलेल्या घटनेची वन विभागाला माहिती कळताच वनविभाग व पोलिसांचा ताफा घटनास्थळी हजर झाला. मौका पंचनामा करून सदर महिलेचा मृतदेह सावली ग्रामीण रुग्णालयात तपासणीसाठी पाठविण्यात आला.या घटनेने सावली परिसरात पुन्हा एकदा भीतीचे वातावरण कायम आहे.#khabarkatta

Pages