राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार व जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा...#State Level Jeevan Gaurav Award and District Level Ideal Teacher Award Ceremony - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार व जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा...#State Level Jeevan Gaurav Award and District Level Ideal Teacher Award Ceremony

Share This
खबरकट्टा/चंद्रपूर:

शिक्षक सहकार संघटना शाखा चंद्रपूर तर्फे आयोजित शिक्षक शिक्षण संवाद कार्यक्रमात राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्कार व जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा तसेच वार्षिक विशेषांक 2023 चे प्रकाशन थाटामाटात संपन्न झाले.

दिनांक 9 एप्रिल 2023 रोजी शिक्षक सहकार संघटना चंद्रपूर तर्फे आदर्श व प्रेरणादायी कार्यक्रम आयोजित केला होता. क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीराव फुले व भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त महाराष्ट्रातील शिक्षण, साहित्य, कला व सामाजिक कार्यात भरीव कार्य करणाऱ्या शिक्षकांना सन्मानित करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शिक्षक सहकार संघटनेचे राज्याध्यक्ष श्री संतोष पिट्टलवाड सर यांनी भुषवले. यावेळी "शिक्षण व अंधश्रद्धा" या विषयावर परिसंवाद ही ठेवला होता. या विषयावर श्री.नरेन गेडाम यांनी सखोल प्रबोधनात्मक व्याख्यान केले. तत्पूर्वी उपस्थित मान्यवरांचे स्वागत भारताचे संविधान व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. पुस्तकेच मस्तक घडवु शकतात या विचाराने लोकशाहीची खरी ताकद असणारे संविधान, शैक्षणिक, साहित्यिक, कला क्षेत्रात कार्याने राष्ट्रीय व राज्यस्तरीय गौरव प्राप्त करणाऱ्या शिक्षकांचे व प्रतिभाशाली विद्यार्थ्यांचे साहित्य असलेला शिक्षक सहकार संघटनेचा वार्षिक विशेषांक शिक्षक शिक्षण संवाद 2023 हा विशेषांक मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला. यावेळी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून शिक्षक सहकार संघटनेचे पदाधिकारी उपस्थित झाले होते. प्रास्ताविकात कार्यक्रमाचे आयोजक व चंद्रपूर जिल्हाध्यक्ष अविनाश जुमडे यांनी शिक्षण क्षेत्रात सकारात्मक कार्य करणाऱ्या निस्वार्थ शिक्षकांचे कौतुक करण्यामागचा उद्देश विषद करुन शिक्षक सहकार संघटना विद्यार्थी हित व शिक्षक हित लक्षात घेऊन कार्य करणारी संघटना आहे. संघटनेच्या शिर्ष नेतृत्वाच्या विचाराने प्रेरित होऊन चंद्रपूर कार्यकारणीने हा सोहळा आयोजित केल्याचे सांगितले. प्रमुख पाहुणे म्हणून गोंडपिंपरी चे गटशिक्षण अधिकारी श्री .समाधान भसारकर उपस्थित होते. आपल्या भाषणात त्यांनी संघटना अनेक पाहिल्या पण सकारात्मक विचाराने प्रेरित व विद्यार्थ्यी हीत व शिक्षक हित केन्द्र मानुन येवढा भव्य व प्रेरणादायी कार्यक्रम राबवणारी पहिलीच संघटना पाहिल्याचे सांगत संघटनेचे कौतुक केले. आपल्या सारख्या शिक्षक संघटनांची व तरुण नेतृत्वाची गरज सध्या शिक्षण क्षेत्राला आहे. असे सांगुन प्रभावी मार्गदर्शन केले. यावेळी मंचावर विस्तार अधिकारी श्री.आवळे व केन्द्रप्रमुख श्री.मारोतराव रायपूररे व श्री. वंदेश फुलझेले उपस्थित होते.

या कार्यक्रमास शुभेच्छा देताना महिला राज्याध्यक्ष श्रीम शुभांगी चौधरी मॅडम यांनी शिक्षण क्षेत्रात महत्वाचे असणारे पण दुर्लक्षित असणाऱ्या घटकास चंद्रपूर शाखेने प्रकाशझोतात आणुन त्यांचा सन्मान केला याचे कौतुक करत अंगणवाडी सेविका व मदतनीस तसेच शालेय पोषण आहार स्वयंपाकी व मदतनीस यांना सन्मानित करण्यात आले याकडे लक्ष वेधले. तर नागपूर विभागप्रमुख श्री रविन्द्र अंबुले सर यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात शिक्षक सहकार संघटना संघटना नसुन परिवार आहे. हा परिवार महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यात पसरलेला आहे. संघटन निस्वार्थ व शिक्षक हित लक्षात घेन कार्य करणारे आहे असे सांगून शिक्षक सहकार संघटनेत सामील व्हा व आपले प्रश्न आपणच सोडवुया असे आवाहन केले. यावेळी जुनी पेन्शन हक्क संघटन चे राज्य उपनेते श्री महेश तांदळे सर ही मंचावर उपस्थित होते. चंद्रपूर जिल्ह्य़ात व राज्यात विविध क्षेत्रात आपले अनमोल योगदान दिल्याबद्दल अविनाश जुमडे सर यांचा सत्कार राज्यकार्यकारणी तर्फे करण्यात आला. अविनाश जुमडे यांनी लघुचित्रपट, साहित्य, कला, अभिनय, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात मोठे कार्य केले आहे. त्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. तो सन्मान त्यांनी आपल्या चंद्रपूर कार्यकारणी सोबत स्विकारला.

राज्य प्रसिद्धीप्रमुख गजानन देवकत्ते यांनी राज्याध्यक्ष यांच्या कामाचा लेखाजोखा सभेपुढे मांडत सहकार संघटना कशा रितीने प्रभावी व परिणामकारक कार्य करते यावर प्रकाश टाकला. नेतृत्व आदेश देणारे नाही तर सोबत घेणारे आहे. पाॅलीसी फाॅलोअर न बनता पाॅलीसी चेंजर व पाॅलीसी मेकर असणारे संघटन व नेतृत्व आहे हे स्पष्ट केले. अध्यक्षीय भाषणात राज्याध्यक्ष संतोष पिट्टलवाड सर यांनी संघटनेची वाटचाल, दिलेला लढा, केलेला संघर्ष व प्रामाणिक पणे व सातत्यपूर्ण पाठपुराव्यास मिळालेले यश यावर सखोल विवेचन केले. लढा सुरु करण्यापूर्वी शिक्षकांची होणारी घुसमट, मानसिक तणाव यांचे अनुभव विषद केले. दै. लोकमत व शिक्षक सहकार संघटना यांच्या अभ्यासपुर्ण नियोजित लढयाचा लेखाजोखाच अध्यक्षांनी उपस्थितांसमोर मांडला. शिक्षक सहकार संघटना नेतेगिरी व चमकोगिरी करण्यासाठी नाही तर शिक्षकांच्या व विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी संघर्ष करण्यासाठी आहे असे आश्वासन दिले. प्रत्येक मागणी विरोध करुन व आंदोलन करुनच सुटत नाही तर सहकार्याने व चर्चेने सुद्धा सुटू शकते याचे परिणामकारक उदाहरण म्हणजे शिक्षक सहकार संघटना होय. अध्यक्षीय भाषणानंतर मान्यवरांच्या हस्ते.

11 राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार

15 जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार

4 विशेष कार्य गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले. शेवटी आभार चंद्रपूर जिल्हा सचिव सुरेंद्र शेंडे सर यांनी मानले. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन कु.एकता बंडावार यांनी केले. तर कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मनोज बनकर,रविराज खडाखडे, शशिकांत चाफेकर,सुरेंद्र गौतम, संदेश गोवर्धन,भालचंद्र कासवटे,अमित दुर्गे,समीर गराटे,अमित खेवले, ज्ञानेश्वर नवले, रत्नपाल कुकुडकर,नितीन पुसाटे, परसराम शेळके, आशिष भिमटे, महिपाल मांढरे, संदीप भुसारे, सत्यवान मुनघाटे, महेंद्र खीररडकर, महेंद्र केवटे, आशिष साठोणे, सचिन कांबळे, राजू गायकवाड,विनोद खापर्ड आदींनी परिश्रम घेतले.

*जिल्हा गुणवंत शिक्षक पुरस्कार*

1 श्री. मनिष अशोकराव मंगरुळकर स.शि.जि. प. उच्च प्राथ. शाळा मूर्ती राजुरा

2. श्री. वसंत उद्धव राखुंडे

स.शि.जि. प. उच्च प्राथ. शाळा महालगाव वरोरा

3. श्री. सचिन चंद्रभान शेरकी

स.शि.जि. प. उच्च प्राथ. आदर्श विद्यालय हिवापुर,चिमुर

4. श्री. भाविक लक्ष्मण सुखदेवे

स.शि.जि. प. उच्च प्राथ. शाळा कोलारी,ब्रह्मपुरी

5. सौ. सुनंदा भाऊराव कोरें

स.शि.जि. प. उच्च प्राथ. आदर्श शाळा नवखळा,नागभिड

6. कु. कल्पना दिनकर सिद्धमशेट्टीवार,मु.अ.

जि. प. उच्च प्राथ. शाळा लोणखैरी तुकूम,सिंदेवाही

7 सौ. प्रज्ञा प्रविण गावतुरे

वि. शि.जि. प. उच्च प्राथ. शाळा चिरोली,मूल

8. श्री. बंडू अशोक गंधेवार

जि. प. प्राथ. शाळा धामणगाव

गोंडपिंपरी

9. कु. मंजूषा अजाबराव डंभारे

वि. शि.जि. प. उच्च प्राथ. शाळा बोर्डा बोरकर

10. कु. कामिना कवडू आत्राम

स.शि.जि. प. उच्च प्राथ. शाळा बेलगाव,सावली

11. श्री. उमेश भोपिदास आडे

स.शि.जि. प. उच्च प्राथ. शाळा उपरवाही,कोरपना

12. सौ. सीमा विलास कोहळे

स.शि.जि. प. उच्च प्राथ. शाळा कचराळा,भद्रावती

13. श्री ऋषी मुल्लाजी मेश्राम

वि. शि.जि. प. उच्च प्राथ. शाळा जिवती, ता.जिवती

14. श्री. भोजराज सुंदरदास चंदेलवार स.शि.

जि. प. प्राथ. शाळा किन्ही बल्लारपूर, ता.बल्लारपूर

15. श्रीमती प्रशंशा प्रेमक वनकर

स. शि.जि. प. प्राथ. शाळा किन्ही अजयपूर, ता.चंद्रपूर

*राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार 2023*

1. श्रीकांत गटय्या काटेलवार

(स.शि.गडचिरोली)

2. श्री गजानन निवृत्ती देवकते

(स.शि.यवतमाळ)

3.श्री. संदीप त्र्यबक ससाणे

(स.शि.नाशिक)

4. सौ. नम्रता लितेशपुरी गोस्वामी

(स.शि.गोंदिया)

5. श्री नरसिंग बाबुराव झरे

(स.शि.लातूर)

6. श्री. सिद्धाराम वासुदेव कोळी

(स.शि.सोलापूर)

7. श्री. लाखेश्वर दयाराम लंजे

(स.शि.गोंदिया)

8. श्री. राजानंद काशीनाथ दुधे

(वि. शि.चंद्रपूर)

9. श्री. रवी बालाजीराव ढगे

(स.शि.नांदेड)

10. श्री. रवींद्र धनराज तिजारे

(स. शि.नागपूर)

11. कु. सरिता देवराम घोरमारे, स. शि.अर्जुनी मोरगाव, गोंदिया

*विशेष पुरस्कार*

1.मा. श्री. गजानन दिवाण, सहसंपाद दै.लोकमत औरगाबाद (गौरव कर्तुत्वाचा )

2.जि. प. उच्च प्राथ. शाळा चिंचाळा ता. जि. चंद्रपूर (जिल्हा आदर्श शाळा पुरस्कार)

3.पूजा विनोद कोल्हे, अंगणवाडी कर. पांढरकवढा (उपक्रमशील अंगणवाडी सेविका)

4.निर्मला नंदकिशोर कावळे (स्वयंपाकी )

5.अनीता संतोष भांडारकर

(मदतनीस )

जि. प. उच्च प्राथ, शाळा दुर्गापुर (विशेष योगदान पुरस्कार )

Pages