धुमाकूळ घालण्याचं कारण म्हणजे पत्रकारितेच्या नावावर विमा कवच व महाराष्ट्र दौऱ्यासाठी निधी जमा करण्याचे काम हे टोळकं मागील काही महिन्यांपासून करीत आहे.
विशेष म्हणजे ग्रामपंचायत कार्यालयात जात त्या टोळक्यातील काही आम्हाला अभ्यास दौरा काढत भव्य कार्यक्रम करायचा असे ते भामटे सांगत आहे, सदर पैसे घेतल्याची पावती काही दिवसांपासून समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे.#khabarkatta chandrapur
त्या पावती वर पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांचं छायाचित्र छापील स्वरुपात आहे, मात्र संघटनेचे कसलेही नाव त्या पावती वर नसून त्यामध्ये कसलाही नोंदणी क्रमांक सुद्धा नाही.पत्रकारितेच्या नावावर हा सरळ खंडणी मागण्यांचा प्रकार असल्याची चर्चा सध्या चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सुरु आहे.#khabarkatta chandrapur
याबाबत कुणीही आपल्याकडे खोटी पावती व माहिती देत असेल तर त्याविरुद्ध तात्काळ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार द्यावी.हे टोळकं चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामपंचायत कार्यालयाला टार्गेट करीत आहे.#khabarkatta chandrapur 
