सरपंच व सदस्याने मागितली पाच हजार रुपयांची लाच...#The sarpanch and the member demanded a bribe of five thousand rupees - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



सरपंच व सदस्याने मागितली पाच हजार रुपयांची लाच...#The sarpanch and the member demanded a bribe of five thousand rupees

Share This
खबरकट्टा/चंद्रपूर:

गडचिरोली : नाली सफाई करण्याच्या कामाचे बिल देण्यासाठी 4 हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या अमिर्झा ग्राम पंचायतीचे सरपंच व सदस्य या दोघांना गडचिरोली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई मंगळवारी सरपंचाच्या घरीच करण्यात आली. सरपंच सोनाली गोकुलदास नागपुरे (32) व ग्रा. पं. सदस्य अजय भास्कर नागापुरे अशी लाच स्वीकारणाऱ्या आरोपींची नावे आहेत.#khabarkatta chandrapur

तक्रारकर्ते हे धुंडेशिवणी येथील आहेत. त्यांनी अमिर्झा व अमिर्झा टोली येथील नाल्यांचा उपसा केला. या कामाचे बिल देण्याकरिता सरपंच व सदस्याने पाच हजार रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती 4 हजार रुपये देण्याचे ठरले. अजय नागपुरे यांनी लाच स्वीकारली. त्यातील 2 हजार 500 रुपये सोनाली नागापुरे यांना दिले. दोघांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.#khabarkatta chandrapur

सदर कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गडचिरोलीचे पोलिस उपअधीक्षक अनिल लोखंडे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक श्रीधर भोसले, सहायक फौजदार प्रमोद ढोरे, नथ्थू धोटे, राजेश पद्मगिरवार, किशोर जौंजाळकर, श्रीनिवास संगोजी, संदीप घोरमोडे, संदीप उडाण, विद्या म्हशाखेत्री, ज्योत्सना वसाके, तुळशीराम नवघरे आदींच्या पथकाने केली

Pages