कोरपना येथील चंद्रपूर महामार्गावरील आदर्श टू व्हीलर गाड्यांच्या हिरो शोरूमला बुधवारी मध्यरात्री दरम्यान अचानक भीषण आग लागल्याने संपूर्ण शोरूममधील साहित्यांची राख रांगोळी झाली. यात शोरूमचे करोडो रुपयांचे नुकसान झाले.#khabarkatta chandrapur
मध्यरात्री दरम्यान लागलेल्या आगीत शोरूम मधील नव्या कोऱ्या गाड्या, टू व्हीलरचे अॅक्सेसरीज, शोरूमची कागदपत्रे, इलेक्ट्रॉनिक वस्तू, संगणक आदी साहित्य पूर्णत: जळून खाक झाले. त्यामुळे शोरूमचे मोठे नुकसान झाले. ही आग शॉर्टसर्किट की नेमकी अन्य कशामुळे लागली हे अजूनही स्पष्ट झाले नाही. शोरूमला लागलेल्या आगीवर अग्निशामक दल पथकाच्या माध्यमातून आग विझवण्यात यश आले आहे. हे शोरुम कोरपना येथील सुहेल आबिद अली यांच्या मालकीचे आहे.#khabarkatta chandrapur 
