चिमूर तालुक्यातील नेरी -- सिरपुर रस्त्यावर सुशिक्षित बेरोजगाराची मिनी पीक अप डग्गा गाडी जळून खाक झाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे मात्र यात कुठल्याही प्रकारची जीवीत हानी झाली नाही.#khabarkatta chandrapur
सिरपूर येथील रहीवासी राहुल परशराम निकोडे , हे आपल्या पिक अप गाडीने नेरी- सिरपुर मार्गाने सिरपुरला येत असताना अगदी ( सिरपूर ) गावाजवळ आज दि 9 रोजी दु. 2.30 वाजताचे सुमारास पिक अप गाडीने पेट घेतला चालकाने प्रसंगावधान साधुन खाली उतरून पाहीले असता गाडीने पेट घेवून रौद्ररूप धारण केले होते आग आटोक्यात आणण्यासाठी काही नागरिक धावून आलेत तो पर्यंत गाडीने पूर्णतः पेट घेवून जळून खाक झाली होती.#khabarkatta chandrapur
सदरील घटनेची माहिती चिमुर पोलीस स्टेशनला देण्यात आली ठाणेदार मनोज गभने सर यांनी विलंब न लावता घटनास्थळी येवून फायर ब्रिगेडच्या गाडी बोलावून आग विझविण्यात आली राहुल निकोडे हे सुशिक्षित बेरोजगार असुन यांनी ही पिकप गाडी तीन चार महिन्या अगोदर नवीनच गाडी घेतली होती या गाडीला अचानक आग लागुन गाडी भस्म झाल्याने रोजगार पासून वंचित झाले आहे.#khabarkatta chandrapur
गाडी चालवुन आपल्या कुटुंबातील सदस्यांचे उधर निर्वाह करायचे अचानकपणे अशा घटनेने त्यांचा रोजगार हिरावल्या गेला आहे संबंधितांनी तात्काळ दखल घेवून आर्थिक भरपाई करावी अशी मागणी होत आहे.