चंद्रपूर जिल्ह्यातील अपंग बांधवांनी वन पर्यटनाचा घेतला लाभ, वनमंत्री मुनगंटीवार यांचा पुढाकार...#Disabled people of Chandrapur district benefited from forest tourism - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



चंद्रपूर जिल्ह्यातील अपंग बांधवांनी वन पर्यटनाचा घेतला लाभ, वनमंत्री मुनगंटीवार यांचा पुढाकार...#Disabled people of Chandrapur district benefited from forest tourism

Share This
खबरकट्टा/चंद्रपूर:

जगप्रसिध्‍द ताडोबा व्‍याघ्र प्र‍कल्‍प बघण्‍यासाठी देशविदेशातील पर्यटक येतात. ताडोबाचे प्राणी, वनवैभव व जैवविविधता जगप्रसिद्ध आहे. देशातील सर्वाधिक वाघ ताडोबा-अंधारी व्‍याघ्र प्रकल्‍पात आहे. त्‍यामुळे हमखास व्‍याघ्र दर्शनासाठी ताडोबा व्‍याघ्र प्रकल्‍पामध्‍ये पर्यटन केले जाते. याच पर्यटनाचा लाभ चंद्रपूर जिल्ह्यातील २४० अपंग बांधवांनी घेतला.#khabarkatta chandrapur

ताडोबा व्‍याघ्र प्रकल्‍प बघता यावा, अशी इच्‍छा विकलांग एकता शक्‍ती संघटना बल्‍लारपूर जि. चंद्रपूर येथील अपंग बांधवांनी राज्‍याचे वन, सांस्‍कृतिक कार्य व मत्‍स्‍य व्‍यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री मुनगंटीवार यांचेकडे व्‍यक्‍त केली होती. सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबत ताडोबा-अंधारीच्या अधिकाऱ्यांना सूचना करीत त्यांना ताडोबा सफर घडवावी असे सांगितले . त्यानुसार 2 ते 7 एप्रिल 2023 पर्यंत टप्याटप्याने चंद्रपूर जिल्ह्यातील अपंग बांधवांनी वन पर्यटनाचा लाभ घेतला. यावेळी त्यांच्यासोबत पालकांनीही ताडोबा सफारी केली.#khabarkatta chandrapur

बल्‍लारपूर येथील विकलांग एकता शक्‍ती संघटनेच्‍या माध्यमातून 240 अपंग बांधवांची आणि त्यांच्या पालकांनी ताडोबा भ्रमंती केली . दिव्‍यांग बांधवांनी ताडोबातील पशू-पक्षी, विविध वृक्ष, विविध प्राणी, ताडोबातील जैवविविधतेचा मनसोक्‍त आनंद लुटला. सुधीर मुनगंटीवार व वनविभागाच्‍या माध्‍यमातून हे पर्यटन दर्शन घडविण्‍यात आले.#khabarkatta chandrapur

भाजप महानगर चंद्रपूरचे कोषाध्‍यक्ष प्रकाश धारणे व वनाधिकारी यांच्‍या माध्‍यमातून ताडोबा व्‍याघ्र प्रकल्‍प दाखविण्‍यात आला. यावेळी अपंग बांधवांनी मुनगंटीवार यांचे आभार व्यक्त केले.


Pages