पोलीस भरतीसाठी बनावट प्रमाणपत्र; वनरक्षकासह सात जण अटकेत...#Fake Certificate for Police Recruitment; Seven people including a forest guard were arrested - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



पोलीस भरतीसाठी बनावट प्रमाणपत्र; वनरक्षकासह सात जण अटकेत...#Fake Certificate for Police Recruitment; Seven people including a forest guard were arrested

Share This
खबरकट्टा/चंद्रपूर:

गडचिरोली: जिल्हा पोलीस दलाने घेतलेल्या पोलीस भरतीत बनावट प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्रांद्वारे आरक्षणाचा लाभ घेऊन भरती झालेल्या दोन पोलीस शिपायांसह तात्पुरत्या यादीत निवड झालेल्या तीन उमेदवारांना 22 एप्रिलला अटक झाली.#khabarkatta chandrapur

या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेल्या सहाव्या फरार आरोपीला पोलिसांनी जेरबंद केले. देविदास ऊर्फ बाळू मेश्राम (रा. नवेगाव, ता. गडचिरोली) असे त्याचे नाव असून, तो आलापल्ली वनविभागात पेरमिली वनपरिक्षेत्रात वनरक्षक आहे.#khabarkatta chandrapur

चालक पोलीस व पोलीस शिपाई पदासाठी 2021 मधील भरती प्रक्रियेत तसेच यापूर्वीच्या भरतीत काही उमेदवारांनी प्रकल्पग्रस्तांच्या समांतर आरक्षणाचा लाभ घेण्याकरिता गडचिरोली येथील एका व्यक्तीच्या मदतीने बीड जिल्ह्यातील खोट्या कागदपत्रांचे आधारे प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र हस्तगत करून नोकरी मिळवल्याचा दावा करणारे एक निनावी पत्र पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांना प्राप्त झाले होते.

त्यांनी याची गांभीर्याने दखल घेत चौकशीचे आदेश गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उल्हास भुसारी यांना दिले. त्यानंतर सातजणांवर गुन्हा नोंदवून राकेश देवकुमार वाढई (29, रा. आलापल्ली, ता. अहेरी), वैभव दिलीप झाडे (26, रा. नवेगाव, ता. मुडझा) या दोन पोलीस शिपायांसह तात्पुरत्या यादीतील आकाश रामभाऊ राऊत (26), मंगेश सुखदेव लोणारकर (26, दोघे रा. नवेगाव), मिन्नाथ पुरुषोत्तम थोरात (29, रा. खरपुंडी) या पाचजणांना अटक केली होती. दोन आरोपी फरार होते, त्यापैकी देविदास मेश्रामला पोलिसांनी अटक केली.#khabarkatta chandrapur

Pages