पुढील 48 तास महाराष्ट्रासह 12 राज्यांमध्ये मुसळधार पाऊस अन् गारपिटीचा इशारा...#Heavy rain and hail warning in 12 states including Maharashtra for next 48 hours - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



पुढील 48 तास महाराष्ट्रासह 12 राज्यांमध्ये मुसळधार पाऊस अन् गारपिटीचा इशारा...#Heavy rain and hail warning in 12 states including Maharashtra for next 48 hours

Share This
खबरकट्टा/चंद्रपूर:
येणाऱ्या काही दिवसात मे 2023 ची सुरुवात होणार आहे मात्र तरीदेखील देशातील काही राज्यात मुसळधार पाऊस पाहायला मिळत आहे तर काही राज्यात तापमानात वाढ होताना दिसत आहे.#khabarkatta chandrapur 

यातच आम्ही तुम्हाला सांगतो हवामान विभागाने महाराष्ट्रासह 12 राज्यांमध्ये पुढील 48 तास मुसळधार पाऊस अन् गारपिटीचा इशारा दिला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार झारखंडमध्ये आजच्या पावसाचा अंदाज जारी करण्यात आला आहे. दुसरीकडे, बिहार, उत्तर प्रदेशमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे तर पुढील काही दिवसात राजस्थान, हरियाणा आणि पंजाबमध्येही हवामानात लक्षणीय बदल होणार आहेत यामुळे मेघगर्जनेचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे.#khabarkatta chandrapur

महाराष्ट्र , मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये पावसाची शक्यता

येत्या 5 दिवसांत मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि विदर्भात जोरदार वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याशिवाय 28 एप्रिलपर्यंत मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय गुजरातमध्ये विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.

गुजरातमध्ये पावसाचा इशारा

गुजरात राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरडे हवामान आहे. सध्या गुजरातमध्ये तापमान खूप जास्त आहे. मात्र, उष्णतेच्या लाटेची शक्यता नाकारण्यात आली आहे. दरम्यान 23 एप्रिलपासून गुजरातमध्ये हवामान बदलाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

हवामान इशारा

विदर्भ, छत्तीसगड आणि तेलंगणामध्ये जोरदार पाऊस आणि गडगडाट होण्याची शक्यता आहे. तामिळनाडूमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.

अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, उप-हिमालयीन पश्चिम बंगाल, सिक्कीम, ओडिशा, पूर्व मध्य प्रदेश, किनारी आंध्र प्रदेश, यानाम, तामिळनाडू, पुडुचेरी, कराईकल, केरळ येथे विखुरलेला पाऊस आणि गडगडाट होण्याची शक्यता आहे.

या राज्यांमध्ये गारपिटीचा इशारा

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज पश्चिम बंगाल, सिक्कीम, छत्तीसगडमध्ये गारपीट होण्याची शक्यता आहे. याशिवाय मध्य महाराष्ट्र मराठवाड्यासह ओडिशा आणि विदर्भातही गारपिटीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

पुढील 24 तासातील हवामान

पुढील 24 तासांत तामिळनाडू, केरळ, दक्षिण भारत, तेलंगणा, विदर्भ, आंध्र प्रदेश आणि ओडिशामध्ये मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

आसाम, अरुणाचल प्रदेश, मेघालय, मणिपूर आणि नागालँड, सिक्कीम, कर्नाटकच्या काही भागांसह मराठवाडा, उत्तराखंडमध्ये हलका पाऊस आणि गारपिटीचा अंदाज आहे.

या राज्यांमध्ये पावसाचा इशारा

ज्या राज्यांमध्ये हवामान खात्याने पावसाचा इशारा दिला आहे. पूर्व भारताव्यतिरिक्त, ईशान्य भागात पुढील 24 तासांत जोरदार वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याशिवाय आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेशच्या अनेक भागात 24 एप्रिलपासून मुसळधार पाऊस पडेल.

Pages