दुर्घटना टळली; तरुणाच्या सतर्कतेमुळे मोठा रेल्वे अपघात टळला...#Due to the youth's alertness, a major train accident was avoided - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



दुर्घटना टळली; तरुणाच्या सतर्कतेमुळे मोठा रेल्वे अपघात टळला...#Due to the youth's alertness, a major train accident was avoided

Share This
खबरकट्टा/चंद्रपूर:

तरुणाच्या सतर्कतेमुळे मोठा रेल्वे अपघात टळला आहे. शहरालगत असलेल्या बाबूपेठ रेल्वे स्टेशनपासून काही मीटर अंतरावर रेल्वे ट्रॅक तुटल्याने भीषण अपघात होण्याची शक्यता होती. पण या भागात राहणाऱ्या शरफुद्दीन पठाण या तरुणाने रेल्वे ट्रॅक तुटल्याची माहिती रेल्वे प्रशासन आणि कर्मचाऱ्यांना तातडीने दिली. शरफुद्दीन पठाण याने दाखविलेल्या सतर्कतेने मोठी दुर्घटना टळली.#khabarkatta chandrapur

जिल्हात सलग चार दिवसांपासून वादळी पाऊस सुरू आहे. या वादळी पावसाचा फटका रेल्वेला बसला आहे. वादळी वारे आणि अवकाळी पावसामुळे रेल्वे विद्युत वाहिनीचा तार तुटली. त्यामुळे तीन तास प्रवासी गाड्यांची वाहतूक खोळंबली होती. यामुळ प्रवाशांची मोठी गैरसोय झाली होती.#khabarkatta chandrapur

ही घटना ताजी असतानाच तरुणाच्या सतर्कतेमुळे रेल्वेचा मोठा अपघात होता होता वाचला आहे. शहरालगत असलेल्या बाबूपेठ रेल्वे स्टेशनपासून काही मीटर अंतरावर रेल्वे ट्रॅक तुटले असल्याचे शरफुद्दीन पठाण याला दिसले. त्याने लगेच याची माहिती रेल्वे प्रशासनाला दिली. प्रशासनाने याची तातडीने दखल घेत एक पथक पाठवून ट्रॅकची तात्पुरती दुरुस्ती करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात यश न आल्याने अखेर रेल्वेरुळाचा एक भागच बदलवावा लागला.#khabarkatta chandrapur

रेल्वे ट्र्कच्या दुरुस्तीमुळे बल्लारपूर - बिलासपूर हा महत्त्वाच्या रेल्वे मार्गावरील वाहतूक काही काळासाठी बाधित झाली होती. ट्रॅक बदलवल्यानंतर आधी मालगाडी या ट्रॅकवर चालवून ट्रॅकची चाचणी करण्यात आली व त्यानंतरच या मार्गावरून सुपरफास्ट एक्सप्रेस सोडण्यात आल्या. रेल्वे पथकाच्या दुरुस्ती चमुच्यावतीने २४ तास रेल्वे रुळांची पाहणी होत असते. मात्र रेल्वे ट्रॅकच तुटल्याचा प्रकार गँगमनच्या कसा लक्षात आला नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे. शरफुद्दीन पठाण या तरुणाने दाखवलेली सतर्कतेमुळे मोठी हानी टळली. त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Pages