खबरकट्टा/चंद्रपूर:
चिमुर तालुक्यातील नेरी येथून जवळच असलेल्या चिखलापार येथील महीलेचा विद्युत करंट लागल्याने म्रुत्यु झाल्याची ह्रदयद्रावक घटना आज दि 21 एप्रिल रोजी सकाळी 8 वा. घडली सरीता रमेश काळे वय 40 वर्षे असे म्रुत पावलेल्या महीलेचे नाव आहे.#khabarkatta chandrapur
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार असे की आज दि 21 एप्रिल ला सकाळी 8 वाजताचे दरम्यान शुक्रवारी चिमुर चा आठवळी बाजार असल्याने चिखलापार येथील स्वतः चे शेतातील भाजीपाला तोडून पाणी सुरू करण्यासाठी पती रमेश काळे हे पेटीवर गेले असता त्यांना विद्युत करंट बसला
पतीला वाचवण्यासाठी पत्नी सरिता ही धावून गेली आणि स्वतःच विद्युत करंटने दगावली घटनेची माहिती मिळताच मैजर मोहुर्ले पोका पुसांडे घटनास्थळी दाखल होवुन प्रेताचा पंचनामा करुन प्रेत उत्तरीय तपासणी करीता चिमुर उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले.#khabarkatta chandrapur

