गुरे वाहुन नेणाऱ्या दोन ट्रक मधील 50 गोवंशिय जनावरांची सुटका: एका आरोपीस केले जेरबंद...#50 cattle escape from two trucks carrying cattle: One accused in jail - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



गुरे वाहुन नेणाऱ्या दोन ट्रक मधील 50 गोवंशिय जनावरांची सुटका: एका आरोपीस केले जेरबंद...#50 cattle escape from two trucks carrying cattle: One accused in jail

Share This
खबरकट्टा/चंद्रपूर:

पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांचे आदेशान्वये ऑल ऑऊट ऑपरेशन मोहिम दरम्यान गांधी चौक मुल येथे नाकाबंदी करीत असता सावली वन मुल कडे दोन ट्रक मध्ये अवैधरित्या जनावरांची वाहतुक करीत असल्याबाबत गुप्त माहिती पोलीस निरीक्षक श्री सुमित परतेकी यांना मिळाल्याने त्यांनी गांधी चौक मुल येथे रात्रौ 3.00 वाजता दरम्यान पंचासह नाकेबंदी करीत असता.#khabarkatta chandrapur

(1) ट्रक क्रमांक एपी29- टीबी - 3519 या ट्रक ला थांबवून त्याची पाहणी केली असता सदर ट्रकचे मागल्या डाल्यामध्ये मध्ये लहान मोठे 24 नग बैल किंमत 3,20,000/- रुपये (2) ट्रक क्रमांक एपी20 वाय 9455 चे मागचे डाल्यामध्ये लहान मोठे 26 नग बैल किंमत 3,60,000/- रुपयाचे अवैधरित्या निर्दयतेने वाहतुक करुन घेवुन जात असतांना मिळुन आले व वाहतुकी करीता वापरण्यात आलेले दोन्ही ट्रक किं. 10,00,000/- रु. असा एकुण 16,80,000/- रुपयाचा मुद्देमाल नेत असता मिळुन आल्याने आरोपी नामे (1) प्रशांत बाळा जुमनाके वय 28 वर्ष रा. गडचांदुर, (2) मोहम्मद अली अजगर अली सैयद, (2) किस्मत अली मो. अली सैयद दोन्ही रा. टेकाडी यांचे विरुद्ध पोलीस स्टेशन मुल येथे अपराध क्रमांक 155 / 2023कलम 5,5(अ), 5 ( ब ) 9 महाराष्ट्र प्राणी सुधारीत अधिनियम 1976 सहकलम 11, (1) (ड) प्राण्यास निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम 1960 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.#khabarkatta chandrapur

सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक श्री रविंद्रसिंह परदेशी तसेच अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री मल्लीकाअर्जुन इंगळे यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्री सुमित परतेकी, सपोनि श्री सतिश बनसोड, सफौ उत्तम कुमरे, पोहवा पुंडलिक परचाके, नापोअ सचिन सायंकार, सुनिल घोडमारे, पोअं गजानन तुरेकर, चालक पोअं स्वप्नील यांनी केली असुन पुढील तपास सपोनि श्री सतिश बनसोड करीत आहेत.

Pages