सुगतकुटी मालेवाडा येथील मुर्ति निर्माणकाम प्रगती पथावर - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



सुगतकुटी मालेवाडा येथील मुर्ति निर्माणकाम प्रगती पथावर

Share This
खबरकट्टा/चंद्रपूर:

तालुक्यातील धम्मभुमी सुगतकुटी येथे 25 फुट उंच तथागत बुद्ध तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे निर्माण करण्याचे चिमूर विधानसभा निर्वाचण क्षेत्राचे युवा काँग्रेस नेते तथा जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी (ओबीसी) दिवाकरभाऊ निकुरे यांनी संकल्प केला.त्याप्रमाणे 5 फरवरीला कामाचे धम्मविधी प्रमाणे भुमिपुजन करण्यात आले.या निर्माण कार्याला सुरवात झाली आहे.#khabarkatta chandrapur 

तथागत बुद्ध तथा विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 25 फुट उंच मुर्तीने तालुक्याच्या सौंदर्यात भर पडणार आहे.त्यामुळे हे काम उच्च दर्जाचे तथा भावी पिढीला यातुन प्रेरणा मिळावी याकरीता भक्कम व्हावे या साठी स्वतः युवा नेते दिवाकर भाऊ निकुरे जातीने लक्ष देत आहेत.७ एप्रिल रोज शुक्रवारला प्रत्यक्ष सुगतकुटी येथे जाऊन पाहणी करून निकुरे यांनी कामा विषयी सुचणा केल्या.यावेळेस त्यांचे सोबत गौतम पाटील,पारस नागरे, श्याम बागडे, गोंविदा दाने, अश्विन उपासे, वैभव कोरे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.#khabarkatta chandrapur 

Pages