श्री शिवाजी महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन...#An alumni meet was organized in Shri Shivaji College - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



श्री शिवाजी महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन...#An alumni meet was organized in Shri Shivaji College

Share This
खबरकट्टा/चंद्रपूर:
राजुरा येथील प्रसिद्ध असलेले श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय राजुरा येथे दि. 9 एप्रिल ला सकाळी अकरा वाजता माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. महाविद्यालयातून शिक्षण घेऊन विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्रित येऊन आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या माजी विद्यार्थी मेळाव्याला मोठया संख्येत उपस्थित राहणार आहेत.#khabarkatta Chandrapur

या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अविनाश जाधव, सचिव, आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ राजुरा तथा माजी जी. प. सदस्य हे उपस्थित राहणार असून उद्घाटक म्हणून डॉ. अनंता सुर, साहित्यिक व समीक्षक प्रोफेसर तथा मराठी विभाग प्रमुख, श्री गजानन महाराज महाविद्यालय मुकुटबन हे उपस्थित राहतील. तर प्रमुख अतिथी म्हणून माजी प्राचार्य व सहसचिव, आ. शि. प्र. मं.दौलतराव भोंगळे, साजिद हुसेन बियाबानी, कोषाध्यक्ष, आ. शी. प्र. मं. डॉ. राजकुमार मुसने, समीक्षक, महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय,आष्टी, अविनाश दोरखंडे, अध्यक्ष, माजी विद्यार्थी संघटना, बादल बेले, सचिव माजी विद्यार्थी संघटना आदींची उपस्थिती राहणार आहे. या माजी विद्यार्थी मेळाव्याला माजी विद्यार्थिनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एम. वरकड, उपप्राचार्य डॉ. राजेश खेरानी तसेच माजी विद्यार्थी संघटनेचे संयोजक डॉ. संतोष देठे यांनी केले आहे.#khabarkatta Chandrapur

श्री शिवाजी महाविद्यालय राजुरा येथील माजी विध्यार्थी संघटनेने यापूर्वी अनेक सामाजिक तसेच विध्यार्थीना प्रोत्साहन देणारे व त्यांना सहकार्य करणारे उपक्रम, कार्यक्रम तसेच कोविड काळात मास्क निर्मिती, भोजनदान, आर्थिक सहाय्यता, व्यक्तिमत्व विकास शिबीर, रक्तदान, गोंडवाना विद्यापीठ स्तरीय लोककला नृत्य स्पर्धा, स्व लिखित कविता गायन अशा विविध स्पर्धाचे सुद्धा आयोजन या माजी विध्यार्थी संघातर्फे करण्यात आले होते.#khabarkatta Chandrapur

Pages