वर्धा : वर्ध्यातील सेकंडहॅण्ड चारचाकी खरेदी विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या तरुणाचे अपहरण करुन 5 लाखांची मागणी करण्यात आली होती. अखेर अपह्यत तरुणाचा मृतदेह 20 रोजी पहाटेच्या सुमारास अल्लीपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या तळेगाव टा. गावानजीक रस्त्याकडेला छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आला.#khabarkatta chandrapur
सुशांत दिलीप ऐडाखे (35) रा. हरिओम नगर धांदे आऊट वर्धा असे मृतक व्यावसायिकाचे नाव आहे. सुशांतचे वर्धा-नागपूर रस्त्यावर मेहेर अॅटोमोटीव्ह नावाचे सेकंडहॅण्ड चारचाकी खरेदी विक्रीचे शोरुम होते. 19 रोजी रात्री 10.30 वाजताच्या सुमारास त्याने दुकान बंद केले आणि घरी जाण्यास निघाला. मात्र, त्याचे अज्ञातांनी अपहरण केले. सुशांत उशिरापर्यंत घरी न पोहचल्याने त्याच्या घरच्यांनी त्याच्या मोबाईलवर कॉल करुन संपर्क केला असता त्याने घाबरट आवाजात 5 लाख रुपये खात्यावर आताच्या आता ट्रान्सफर करण्यास सांगितले.
घरच्यांनी पुन्हा फोन केला असता त्याचा फोन स्विचऑफ होता. अखेर आज 20 रोजी त्याचा मृतदेह तळेगाव टालाटुले गावानजीक रस्त्याकडेला छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आला. अपहरणकर्त्यांनी त्याला मारहाण करीत चारचाकी खाली फेकून त्याच्या शरिरावरुन चारचाकी नेल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पुढील तपास पोलिस करीत आहे.#khabarkatta chandrapur 

