खबरकट्टा/चंद्रपूर:
नेफडो च्या महाराष्ट्र राज्य युवा अध्यक्षपदी बबलू चव्हाण तर नागपूर विभाग युवा अध्यक्षपदी आशिष करमरकर यांची पदोन्नती.नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या महाराष्ट्र राज्य युवा कार्यकारणीत राजुरातील युवकांना स्थान.
नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था ही संपूर्ण महाराष्ट्र सह देश व आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध समित्याच्या माध्यमातून कार्यरत आहे. राष्ट्रीय पर्यावरण संवर्धन व मानवता विकास समिती, राष्ट्रीय कला, साहित्य व सांस्कृतिक विकास समिती, राष्ट्रीय वन्यजीव संवर्धन समिती, गड -किल्ले संवर्धन समिती अशा समितीच्या माध्यमातून कार्यरत या संस्थेच्या पर्यावरण समितीच्या महाराष्ट्र राज्य युवा अध्यक्षपदी बबलू चव्हाण तर नागपूर विभाग युवा अध्यक्षपदी आशिष करमरकर यांची सर्वांनुमते निवड करण्यात आली.#khabarkatta chandrapur
हे दोन्ही युवक राजुरा जी. चंद्रपूर येथील निवासी असून ते गेल्या दोन -तीन वर्षांपासून सातत्याने पर्यावरण संवर्धन व मानवता विकासाचे कार्य करीत समाजसेवा सुद्धा करीत आहेत. वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन, गरजू गरिबाना मदत, शैक्षणिक साहित्य वाटप, दिव्यांगाना मदत, अंतिम संस्कार करीता सुद्धा यांनी गरजूना सहकार्य केले आहे. धार्मिक, सामाजिक व पर्यावरण उपक्रम, कार्यक्रमात यांनी हिरीरीने सहभाग दर्शवीला आहे. त्यांची निवड संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुयोग धस, राष्ट्रीय उपाध्यक्ष दिपक भवर, सचिव सचिन वाघ, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष बादल बेले, उपाध्यक्ष प्रकाश कदम, सचिव बापू परब, महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्षा डॉ. प्रीती तोटावार, उपाध्यक्षा तेजस्विनी नागोसे, महासचिव आसिया रिजवी यांनी केली आहे.#khabarkatta chandrapur
त्यांच्या या निवडीबद्दल राष्ट्रीय कला, साहित्य व सांस्कृतिक विकास समितीच्या नागपूर विभाग अध्यक्षा अल्का सदावर्ते, नागपूर विभाग अध्यक्ष विजयकुमार जांभुळकर, महिला अध्यक्ष रत्ना चौधरी, वन्यजीव संवर्धन समितीचे नागपूर विभाग अध्यक्ष विलास कुंदोजवार, दिलीप सदावर्ते, रजनी शर्मा, संतोष देरकर आदींनी अभिनंदन केले.

