अवैध सुगंधीत तंबाखू, सुपारी गुटखा विक्री करणाऱ्यांची माहिती घेऊन कार्यवाही करावी-जिल्हाधिकारी श्री. गौडा...#Action should be taken with the information of the sellers of illegal flavored tobacco, betel nut Gutkha - District Magistrate Shri. Gouda - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



अवैध सुगंधीत तंबाखू, सुपारी गुटखा विक्री करणाऱ्यांची माहिती घेऊन कार्यवाही करावी-जिल्हाधिकारी श्री. गौडा...#Action should be taken with the information of the sellers of illegal flavored tobacco, betel nut Gutkha - District Magistrate Shri. Gouda

Share This
खबरकट्टा/चंद्रपूर :
जिल्ह्यात सुगंधित तंबाखू, सुपारी, गुटखा यावर प्रतिबंध घालण्यात आला आहे. मात्र, शहरात मोठ्या प्रमाणात तंबाखू व गुटखा विक्री होत आहे. या प्रकारावर आळा घालण्यासाठी अवैध साठा शोधून तंबाखू व गुटखा विक्री करणाऱ्यांवर कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी सी यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाला दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात सुरक्षित अन्न आणि निरोगी आहारासाठी सल्लागार समितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त नितीन मोहिते, अन्न सुरक्षा अधिकारी श्री. टोपले, पोलीस निरीक्षक रोशन पाठक, पोलीस विभागाच्या अपर्णा मानकर, जिल्हा महिला व बालविकास विभागाचे परिविक्षा अधिकारी दिवाकर महाकाळकर, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी पांडूरंग माचेवाड, मनोहर चीटनुरवार तसेच ग्राहक संस्थेचे प्रतिनिधी आदींची उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, अवैध सुगंधीत तंबाखू, सुपारी गुटखा विक्री करणाऱ्यांची माहिती घेऊन कार्यवाही करावी. पोलीस विभागाने याबाबत माहिती घ्यावी. ज्या अन्नपदार्थ विक्रेत्यांकडे व व्यावसायिकांकडे अन्न परवाना नाही, याबाबत चौकशी करुन अशा आस्थापनांना भेटी द्याव्यात.

अन्न व्यावसायिकांचे परवान्याचे नूतनीकरण करावेत. तसेच इट राईट चॅलेंज उपक्रमांतर्गत अन्नपदार्थाविषयक माहिती द्यावी. जेणेकरून, नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण होईल, असे ते म्हणाले.


Pages