राजूरा रोडवरील बीपीसीएल व बामनवाडा येथील एचपी पेट्रोल पंपावर दोन अज्ञात व्यक्तींनी बंदूकीसह प्रवेश केला असल्याची धक्कादायक घटना 27 फेब्रुवारी च्या पहाटे घडली Crime सदर घटनेची तक्रार पेट्रोल पंप धारकांनी राजूरा पोलीस ठाण्यात दाखल केली होती त्यातील दोन आरोपींना अटक करण्यात राजूरा पोलिसांना यश प्राप्त झाले आहे. Two arrested for trying to rob a petrol pump with a fake gun
विशेष म्हणजे लुटमारीच्या प्रयत्नात वापरण्यात आलेली बंदुक ही नकली प्लॅस्टिक ची बंदुक निघाली. Duplicate Gun (Plastic)चंद्रपूर - राजूरा रोडवरील उड्डाणपूला बाजूच्या बीपीसीएल BPCL Petrol pump चे पेट्रोल पंपवर दोन दुपट्टा बांधलेले युवकांनी प्रवेश केला होता परंतु येथे लोकांची गर्दी जास्त असल्याने त्यांनी कोणतेही कृत्य केले नाही आणि बामनवाडा येथील डी आर कोतपल्लीवार पेट्रोल पंप HP Petrol pump कडे वळले तेव्हा नोझलवर वर असणाऱ्या कामगाराला बंदकधारी दिसल्याने पेटोल पंपा च्या कार्यालयातधाव घेत दार बंद करून घेतले त्यामुळे बंदुकधाऱ्यांना लूटमार करता आली नव्हती.
पेट्रोल पंप व्यवस्थापकाने राजूरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
राजूरा पोलीस ठाण्यात भादवि 393 अन्वये 3/25 व भारतीय शस्त्रबंदी कायद्या अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला. Rajura Police Stationराजूरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांच्या नेतृत्वात तपासाची चक्रे फिरविण्यात आली दरम्यान राजूरा पोलीसांना गोपाल सुधाकर घुबडे वय 24 वर्ष व कुंदन विजय पेटकर वय 23 वर्ष दोन्ही राहणार राजूरा हे संशयित आढळून आले असता त्यांना ताब्यात घेत कसून चौकशी केली असता सदर गुन्ह्याची कबुली दिली.
त्यावरून या दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून गुन्ह्यात वापरलेली दुचाकी, दोघांचे मोबाईल व नकली बंदुक असा एकूण 40 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक रवींद्र सिंग परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु उपविभागीय पोलीस अधिकारी राजा पवार यांच्या मार्गदर्शनात राजूरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक योगेश्वर पारधी यांच्या नेतृत्वात पोऊनी ओमप्रकाश गेडाम, स. फो. खुशाल टेकाम, नागोराव भेंडेकर, रवींद्र तुराणकर, रामराव डिंगेवाड व राजूरा पोलीसांनी केली.