शेतकऱ्यांच्या खुणप्रकरणी विधानसभेत पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन...#Point of information in the Legislative Assembly regarding farmers' marks - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



शेतकऱ्यांच्या खुणप्रकरणी विधानसभेत पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन...#Point of information in the Legislative Assembly regarding farmers' marks

Share This
खबरकट्टा/चंद्रपूर:

चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यात असलेल्या मांगली परिसरामध्ये शेत शिवारात असलेल्या मंदिरात झोपी गेलेल्या दोन शेतकऱ्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. चोरीच्या दृष्टीने आलेल्या या दरोडेखोरांनी शेतकऱ्यांची हत्या केली असून त्यांचा तपास तातडीने करून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी भद्रावती वरोरा मतदारसंघाच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांनी पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन च्या माध्यमातून विधानसभेत केली आहे.#khabarkatta

भद्रावळी तालुक्यातील मांगली परिसरामध्ये जगन्नाथ बाबा मंदिर आहे शेतकरी बापूजी खारकर आणि त्याचे सहकारी मधुकर खोजे वयोवृद्ध असून दोघेही मंदिरात झोपले होते मंदिरात दानपेटी चोरीसाठी आलेल्या दरोडेखोरांनी या दोघांची हत्या केली या घटनेमुळे भद्रावती मतदारसंघांमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. याकडे आमदार प्रतिभा धानोरकर यांनी पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या अनुषंगाने सभागृहाचे लक्ष वेधले. या दरोडेखोरांची तातडीने चौकशी करून आरोपींना कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

Pages