आदर्श शाळेत पर्यावरणपूरक होलिकोत्सवाचे आयोजन संपन्न...#Organization of eco-friendly Holikotsav completed - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



आदर्श शाळेत पर्यावरणपूरक होलिकोत्सवाचे आयोजन संपन्न...#Organization of eco-friendly Holikotsav completed

Share This
खबरकट्टा/चंद्रपूर :
बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित आदर्श मराठी प्राथमिक विद्यामंदिर तथा आदर्श हायस्कूल राजुरा येथील राष्ट्रीय हरी सेना छत्रपती शिवाजी महाराज स्काऊट युनिट व जिजामाता गाईड युनिटच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण पूरक होलिकोत्सव साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सतीश धोटे, अध्यक्ष,बालविद्या शिक्षण प्रसारक मंडळ राजुरा यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.#khabarkatta 

तर प्रमुख अतिथी म्हणून भास्करराव येसेकर, सचिव, मधुकर जाणवे, संचालक, नेफडो अंतर्गत असलेल्या समित्याचे पदाधिकारी अल्का सदावर्ते, नागपूर विभाग अध्यक्षा, राष्ट्रीय कला, साहित्य व सांस्कृतिक विभाग, विलास कुंदोजवार, वनपाल तथा नागपूर विभाग अध्यक्ष, राष्ट्रीय वन्यजीव संवर्धन समिती, संतोष देरकर, चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष, नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास समिती, दिलीप सदावर्ते, चंद्रपूर जिल्हा जनसंपर्क अधिकारी नेफडो, बबलू चव्हान, चंद्रपूर जिल्हा युवा सचिव, नेफडो, सारीपुत्र जांभुळकर मुख्याध्यापक, आदर्श हायस्कूल, नलिनी पिंगे, मुख्याध्यापिका आदर्श प्राथमिक शाळा, ज्येष्ठ शिक्षिका ज्योती कल्लूरवार, पालक प्रतिनिधी विजय तलांडे, किशोर वरवाडे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.

राष्ट्रीय हरीत सेना विभाग प्रमुख तथा छत्रपती शिवाजी महाराज स्काऊट युनिट लीडर बादल बेले यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी पर्यावरण पूरक होलिकोत्सव साजरा करण्यात येतो. शालेय परिसरात स्वच्छता मोहीम राबवून प्लास्टिकचा कचरा हा नगर परिषदेच्या स्वाधीन करण्यात येतो. तर समाजातील व माणवी मनातील असलेले दुर्गुण, वाईट कृती, व्यसन, वृक्षतोड, कुपोषण, वन्य प्राण्यांची शिकार, अज्ञान, अंधश्रद्धा, अहंकार, आळस, द्वेष, प्लास्टिकचा वापर, भेसळयुक्त पदार्थ, स्त्रीभ्रूणहत्या, बालविवाह, कोरोना जातीभेद, मोबाईलचा अतिवापर, मोबाईलवरील जीवघेणे खेळ, भ्रष्टाचार, बेरोजगारी अशा विविध विषयाना होळी च्या माध्यमातून अग्नी देण्यात येते. यावर्षीचे विशेष आकर्षण म्हणजे विद्यार्थ्यांनी फेस पेंटिंग च्या माध्यमातून सेव टायगर, सेव वॉटर, सेव्ह नेचर, सेव ट्री, वाढते प्रदूषण, असे संदेश दिले. हे आकर्षणाचे विषय ठरले.#rajura 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, प्रास्ताविक व आभार बादल बेले यांनी मानले. विध्यार्थीनी तयार केलेल्या नैसर्गिक रंगाची होळी सुद्धा साजरी करण्यात आली. राष्ट्रीय हरित सेना, स्काऊट गाईडच्या विद्यार्थिनींनी लक्षवेधी नृत्य सादर करून उपस्थितीतांची मने जिंकली.#chandrapur 

Pages