धक्कादायक ! सुनेच्या प्रियकराचा सासूवर बलात्कार...#Daughter-in-law's boyfriend rapes mother-in-law - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



धक्कादायक ! सुनेच्या प्रियकराचा सासूवर बलात्कार...#Daughter-in-law's boyfriend rapes mother-in-law

Share This
खबरकट्टा/चंद्रपूर :
नागपूर : विवाहित प्रेयसीला घरी भेटायला आलेल्या प्रियकराने प्रेयसीसमोरच तिच्या सासूवर बलात्कार केला. ही धक्कादायक घटना मौदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी सुनेच्या प्रियकराला अटक केली. विनू (28) असे नराधम आरोपीचे नाव आहे.#khabarkatta

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनूचे गावातीलच एका तरुणीशी सूत जुळले होते. तिचे गावातील एका नातेवाईकाशी लग्न ठरले. त्यामुळे विनूने लग्न न करण्याचा निर्णय घेतला. प्रेयसी पतीसह गावातच सुखाने संसार करीत असल्याचे विनूला बघवत नव्हते. त्याला दारूचे व्यसन जडले. त्याने विवाहित प्रेयसीला पुन्हा आपल्याकडे आकर्षित केले. त्यामुळे लग्न झाल्यानंतरही पतीच्या नजरेआड ती विनूशी विवाहबाह्य संबंध ठेवत होती. त्या महिलेच्या घरात मूकबधिर सासू (45) राहते. विनू अनेकदा सासूसमोरच प्रेयसीला घरात भेटायला येत होता.

विनूला भेटायला सासू नेहमी विरोध दर्शवत होती. परंतु, सून ही प्रेमसंबंध तोडायला तयार नव्हती. शेवटी मुलाचा संसार तुटू नये म्हणून ती विचार करीत होती. त्यामुळे सुनेची हिंमत वाढली. मूकबधिर सासूसमोरच सून आणि विनू हे दोघे घरात अश्लील चाळे करीत होते. 3 मार्च रोजी दुपारी तीन वाजता विनू हा प्रेयसीला भेटायला घरी आला. त्यावेळी तो दारूच्या नशेत होता. त्याने सुनेसमोरच मूकबधीर असलेल्या सासूवर बलात्कार केला. त्यावेळी सुनेने आरोपी विनूला कोणताही विरोध केला नाही.

रात्री आठ वाजता सासूने आपल्या पतीला घडलेल्या प्रकाराची खाणाखुणा करून माहिती दिली. त्यांनी सुनेला विचारपूस केल्यानंतर मौदा पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी तक्रारीवरून गुन्हा दाखल केला. आरोपी विनूला अटक केल्यानंतर त्याने प्रेमप्रकरणाची आणि केलेल्या कृत्याची कबुली दिली.

Nagpur: A lover who came to meet a married girlfriend at home raped her mother-in-law in front of the girlfriend. This shocking incident came to light in a village under Mouda police station limits. The police arrested the daughter-in-law's boyfriend in this case. The accused has been identified as Vinu (28).# khabarkatta 

According to the police, Vinu had an affair with a young woman from the village. She got married to a relative in the village. So Vinu decided not to get married. Vinula could not see that the beloved was living happily in the village with her husband. He got addicted to alcohol. He lured his married lover back to him. So even after marriage, she was having an extra-marital relationship with Vinu behind the scenes of her husband. A deaf mother-in-law (45) lives in that woman's house

Mother-in-law was always against meeting Vinu. But, the daughter-in-law was not ready to break the relationship. Finally, she was thinking that the child's world should not be broken. So Sun's courage increased. Daughter-in-law and Vinu were doing obscenities in the house in front of deaf mother-in-law. On 3rd March at 3 pm, Vinu came home to meet his girlfriend. He was drunk at that time. He raped the mute mother-in-law in front of her daughter-in-law. At that time, the daughter-in-law did not oppose the accused Vinu.#nagpur crime

At eight o'clock in the night, the mother-in-law informed her husband about the incident. After questioning the daughter-in-law, they reached Mauda police station. The police registered a case based on the complaint. After arresting the accused Vinu, he confessed to the affair and the act.

Pages