ओबीसी विद्यार्थ्यांची चिंता दूर, जिल्हानिहाय वसतिगृह सुरू होणार #obc, - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



ओबीसी विद्यार्थ्यांची चिंता दूर, जिल्हानिहाय वसतिगृह सुरू होणार #obc,

Share This
खबरकट्टा /चंद्रपूर :

राज्यातील इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हानिहाय वसतिगृह सुरू करण्यात येत आहे. प्रत्येक जिल्ह्यात दोन याप्रमाणे ७२ वसतिगृह (मुलींसाठी आणि मुलांसाठी) राहतील आणि हे वसतिगृह राज्य सरकार इमारत भाड्याने घेऊन स्वत: चालवणार आहे.त्यासंदर्भातील शासन निर्णय आज काढण्यात आला आहे.#obc #khabarkatta

राज्य सरकार हे वसतिगृह स्वयंसेवी संस्थांना वसतिगृह चालविण्यासाठी देण्याचा विचार करीत होते. परंतु आता शासनाने स्वत: वसतिगृहासाठी इमारत भाड्याने घेवून प्रत्येक जिल्ह्यात, इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील १०० मुले व १०० मुली या मर्यादेत प्रति जिल्हा २०० याप्रमाणे ३६ जिल्ह्यांसाठी एकूण ७२०० पात्र विद्यार्थ्यांची दरवर्षी व्यवस्था केली जाणार आहे. विद्यार्थी, विद्यार्थींनींना भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हानिहाय दोन याप्रमाणे ७२ वसतिगृहे सुरू करण्याचा निर्णय २८ फेब्रुवारी शासनाने घेतला आहे.#khabarkatta

Pages