रिव्हॉल्वरच्या धाकावर डॉक्टरचे अपहरण...#Kidnapping of doctor at revolver - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



रिव्हॉल्वरच्या धाकावर डॉक्टरचे अपहरण...#Kidnapping of doctor at revolver

Share This
खबरकट्टा/चंद्रपूर:

वणी (यवतमाळ) : रुग्णालयातील काम आटोपून स्कुटीने मारेगावकडे येणाऱ्या एका डॉक्टरला रिव्हॉल्वरच्या धाकावर अडविले. त्यानंतर त्याला कारमध्ये बसवून वणीत आणण्यात आले. येथे डॉक्टरने मित्राकडून तीन लाख रुपये घेऊन ते अपहरणकर्त्यांना दिले. त्यानंतर अपहरणकर्त्यांनी डॉक्टरला मारेगाव मार्गाने परत नेऊन वाटेत सोडून दिले. ही थरारक घटना सोमवारी (दि. 13) सायंकाळी 7.30 वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी मारेगाव पोलीस ठाण्यात चार अज्ञात लुटारूंविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डॉ. प्रोवेश हाजरा (48) असे अपहरण झालेल्या डॉक्टरचे नाव आहे. मारेगाव तालुक्यातील नवरगाव येथे त्यांचे क्लिनिक आहे. नेहमीप्रमाणे सोमवारी सायंकाळी ओपीडी आटोपून स्कुटीद्वारे ते मारेगावकडे येत असताना 7.30 वाजताच्या सुमारास मारेगाव यवतमाळ मार्गावरील करणवाडीजवळ असलेल्या पेट्रोलपंपालगत मागून आलेल्यास्विफ्ट कारने त्यांना अडविले. त्यातून उतरलेल्या एकाने डॉ. हाजरा यांच्या डोक्याला रिव्हॉल्वर लावून कारमध्ये बसण्यास सांगितले.

डॉक्टर हाजरा यांना कारमध्ये बसविल्यानंतर अपहरणकर्त्यांची कार मारेगावकडे निघाली. कारमधील चारजणांपैकी एकाने डॉक्टरची स्कुटी घेतली. नंतर मारेगावजवळ रस्त्याच्या कडेला स्कुटी सोडून देण्यात आली. या अपहरणकर्त्यांनी डॉक्टरला जीवे मारण्याची धमकी देत पाच लाखांची मागणी केली. त्यावर डॉक्टरने माझ्याकडे एवढी रक्कम नाही. मात्र वणी येथील मित्राकडून तीन लाख रूपये घेऊन तुम्हाला देतो, असे अपहरणकर्त्यांना सांगितले. त्यानंतर डॉक्टरला घेऊन ही कार वणीतील शेवाळकर परिसरात पोहोचली. डॉ. हाजरा यांनी मोबाईलवरून मित्राशी संपर्क साधून तीन लाख रूपये मागितले. मित्राने ही रक्कम तातडीने शेवाळकर परिसरात पोहोचविली.

पैसे मिळताच अपहरणकर्ते डॉक्टरला घेऊन पुन्हा मारेगावकडे निघाले. वाटेत डॉक्टरच्या गळ्यातील सोन्याची साखळी, हातातील अंगठीही काढून घेतली. त्यानंतर वणी-मारेगाव दरम्यान असलेल्या निंबाळा गावाजवळ डॉक्टरला सोडून देऊन अपहरणकर्ते मारेगावच्या दिशेने निघून गेले. दरम्यान, डॉ. हाजरा यांनी घडलेल्या घटनेची तक्रार मारेगाव पोलीस ठाण्यात दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी अपहरणकर्त्याविरूद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. पोलिसांकडून अपहरणकर्त्यांचा शोध सुरू आहे.

Pages