स्पोर्ट्स बाईक चा जलवा बेतला जिवावर; युवकांचा जिवघेणा थरार...#The deadly thrill of youth - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



स्पोर्ट्स बाईक चा जलवा बेतला जिवावर; युवकांचा जिवघेणा थरार...#The deadly thrill of youth

Share This


खबरकट्टा/चंद्रपूर: :

शहरातील नागपूर मार्ग आता अपघाताचे कारण ठरत आहे. सकाळी झालेल्या एका अपघातात स्पोर्ट्स बाईकस्वार युवकांनी वळण घेत असलेल्या बसला थेट धडक दिली.#The deadly thrill of youth

स्थानिक विश्रामगृहासमोर झालेल्या या अपघातात चंद्रपूरकर रहिवासी असलेले दोन युवक गंभीर जखमी झाले. अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या कर्मचाऱ्यांना घेऊन जाणारी ही बस शहराकडे वळसा घेत होती. मात्र अतिवेगात असलेल्या बाईक स्वरांनी नियंत्रण गमावले आणि हा अपघात झाला. या भागात असलेल्या रहिवाशांनी तातडीने जखमी युवकांना मदत केली. या दोन्ही युवकांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.#The deadly thrill of youth

चंद्रपूर नागपूर मार्गाचा हा भाग मजबुतीकरण व सौंदर्यीकरण केल्यानंतर रुंद झाला आहे. यामुळे या रस्त्यावर भरधाव वेगात बाईक चालवण्याची जणू स्पर्धाच असते. अतिवेगाच्या नादात हा अपघात झाला. रामनगर पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत.






Pages