LCB ने मोटर सायकल चोरीच्या गुन्ह्यामधील आरोपिंच्या मुसक्या आवळल्या...#LCB arrested the accused in the motorcycle theft case - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



LCB ने मोटर सायकल चोरीच्या गुन्ह्यामधील आरोपिंच्या मुसक्या आवळल्या...#LCB arrested the accused in the motorcycle theft case

Share This
खबरकट्टा/चंद्रपूर :

चंद्रपुर जिल्हयामध्ये होत असलेल्या वाहन चोरीच्या गुन्हयांना आळा घालण्याकरिता मा. पोलीस अधिक्षक, चंद्रपुर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला विशेष निर्देश दिले होते वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याकरिता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक मा. महेश कोंडावार यांनी विशेष पथक तयार करून त्यांना त्याबाबत निर्देश दिले होते 

दि. 01/03/2023 रोजी पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपुर यांचा मार्गदर्शनाखाली स्थागुशा पथक हे मोसा चोरीचे रेकॉर्डवरिल गुन्हेगार शोध मोहीम पेट्रोलिंग राबवीत असतांना उडीया मोहल्ला जलनगर वार्ड चंद्रपूर येथे सापळा रचून रेकॉर्डवरील गुन्हेगार नामे सचिन ताराचंद घरत वय 35 वर्ष रा. इंदिरानगर वार्ड चंद्रपूर यास ताब्यात घेवूण बिनाकागदपत्राची हिरो स्प्लेंडर प्लस मोसा. क्र. एम.एच. 34 बी. वाय. 1433 ही गाडी ताब्यात घेतली. सदर गाडी व्यतिरीक्त आणखी दोन मोपेड गाडया चोरल्याचे सांगितल्याने त्याचे कडून सफेद रंगाची अॅक्टीवा 5जी गाडी व लाल रंगाची एविएटर गाडी दोन्ही बिना क्रमाकांच्या गाडया हस्तगत केले आहे. 

नमुद आरोपीने इंदिरानगर वार्ड, गेल्यावर्षी सोलार केमिकल वार्ड तसेच साई पॉलिटेक्नीक कॉलेज चे मागील परिसरातून नमुद गाडया चोरल्याचे सांगितल्याने त्याचे कडून एकूण ३ मो.सा. हस्तगत केल्या आहे. पो.स्टे. रामनगर :-1) कि. 70,000/- एक सिल्व्हर काळया रंगाची हिरो स्पेन्डर प्लस
मो.सा. क्रमांक MH 34 BY 1433

2) कि. 50,000/- एक सफेद रंगाची अॅक्टीवा 5 जी मोपेड गाडी बिना कमांकाची 3) कि. 70,000/- एक लाल रंगाची एविएटर मोपेड गाडी बिना कमाकांची असा एकूण 1,90,000/- रू. चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.नमुद आरोपीकडून पोस्टे रामनगर मधील 3 मोसा. चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहे. पुन्हा मोसा. चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

सदरची कामगिरी ही मा. पोलीस अधिक्षक सा. चंद्रपूर, मा. अपर पोलीस अधिक्षक सा. यांचे मार्गदर्शना खाली पोलीस निरीक्षक महेश कोंडावार स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर यांचे नेतृत्वात पोहवा संजय आतकुलवार ब.नं. 2215, पो.अं. नितीन रायपुरे ब.नं. 2549 पो.अं. प्रांजल झिलपे ब.नं. 2948, पो.अं. रविंद्र पंधरे / 1558 यांनी केली.

Chandrapur district Mr. Superintendent of Police, Chandrapur had given special instructions to the local crime branch to expose the crime of vehicle theft. Mahesh Kondawar had formed a special team and instructed them in this regard

Date. On 01/03/2023, under the guidance of Police Inspector Local Crime Branch, Chandrapur, the Sthagusha squad was carrying out a patrolling operation to search for the criminals on record of theft by laying a trap at Udia Mohalla, Jalnagar Ward, Chandrapur. Indiranagar Ward Chandrapur Detention of Undocumented Hero Splendor Plus Mosa. No. M.H. 34 b. Y. Car 1433 was seized.

Apart from the said car, two more moped cars were said to have been stolen, a white colored Activa 5G car and a red colored Aviator car, both without serial numbers, have been seized from him. As Namud accused said that he had stolen Namud vehicles from Indiranagar ward, Solar Chemical ward last year and Sai Polytechnic College, he received a total of Rs. has been captured. Po.St. Ramnagar :-1) Km. 70,000/- for a Silver Black Hero Spender Plus

2) km. 50,000/- one white color Activa 5G moped without license plate 3) Km. 70,000/- a red color Aviator moped car without salary such total 1,90,000/- Rs. 3 Mosa of Poste Ramnagar was seized from the accused. Crimes of theft have been revealed. Measure again. Crimes of theft are likely to be exposed.

Pages