नक्षलवाद्यांकडून बांधकामांवरील वाहनांची जाळपोळ; पुन्हा एकदा नक्षलवादी सक्रिय झाल्याचे चित्र...#Burning of vehicles on construction sites by Naxalites - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



नक्षलवाद्यांकडून बांधकामांवरील वाहनांची जाळपोळ; पुन्हा एकदा नक्षलवादी सक्रिय झाल्याचे चित्र...#Burning of vehicles on construction sites by Naxalites

Share This
खबरकट्टा/चंद्रपूर:
एटापल्ली तालुक्यातील पुरसलगोंदी – अलेंगा मार्गावरील दामिया नाल्याजवळ नक्षलवाद्यांकडून बांधकामावरील काही वाहनांची जाळपोळ करण्यात आली. दोन दिवसांपूर्वी भामरागड तालुक्यात देखील रस्ता बांधकामावरील वाहनांची जाळपोळ करण्यात आली होती. यामुळे दक्षिण गडचिरोलीत पुन्हा एकदा नक्षलवादी सक्रिय झाल्याचे चित्र आहे. एटापल्ली तालुक्यात मागील काही महिन्यांपासून नक्षलवाद्यांच्या हालचाली वाढल्या आहेत.# khabarkatta Chandrapur 

त्यात गुरुवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास पुरसलगोंदी – अलेंगा मार्गावर सुरू आलेल्या पुलाच्या बांधकामस्थळी उभे असलेल्या वाहनांना नक्षलवाद्यांनी पेटवून दिले. यात 1 जेसीबी,1 पोकलॅन आणि 1 मिक्सरमशीनचा समावेश आहे. यावेळी 15 ते 20 सशस्त्र नक्षलवादी उपस्थित असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दोन दिवसांपूर्वीच भामरागड तालुक्यातील विसामुंडी मार्गावर देखील एका वाहनाची जाळपोळ करण्यात आली होती. यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे. यासंदर्भात पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी जाळपोळीच्या घटनेला दुजोरा दिला आहे.# gadchiroli 

Khabarkatta/Chandrapur:


Naxalites torched some construction vehicles near Damia Nalla on Pursalgondi – Alenga road in Etapalli taluk. Two days ago, in Bhamragarh taluka, vehicles on road construction were also set on fire. Due to this, Naxalites are once again active in South Gadchiroli. The movements of Naxalites have increased in Etapalli taluk since last few months.

Naxalites set fire to the vehicles parked at the construction site of the bridge on the Pursalgondi-Alenga road around 8 pm on Thursday. It includes 1 JCB, 1 Poklan and 1 Mixer Machine. Sources have informed that 15 to 20 armed Naxalites are present at this time. Two days ago, a vehicle was also set on fire on Visamundi Marg in Bhamragarh taluka. Due to this there is an atmosphere of terror in the area.

Pages