आज काष्ठपुजन शोभायात्रेसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती...#Attendance of Deputy Chief Minister Devendra Fadnavis for Kashta Pujan procession today - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



आज काष्ठपुजन शोभायात्रेसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती...#Attendance of Deputy Chief Minister Devendra Fadnavis for Kashta Pujan procession today

Share This
खबरकट्टा/चंद्रपूर :

आज बुधवार दि. 29 मार्च रोजी प्रभु श्रीराम मंदिर अयोध्या काष्ठपुजन समिती, चंद्रपुर द्वारा आयोजित प्रभु श्रीराम मंदिर अयोध्याकरीता बल्लारपुर येथील एफ.डी.सी.एम. मधुन काष्ठ पाठविण्यात येत आहे. या शोभायात्रेसाठी सायंकाळी 6.30 वाजता चंद्रपूरचे आराध्य दैवत माता महाकाली मंदिरात काष्ठसमर्पण प्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांची उपस्थिती राहणार असून सायं. 4 वाजता नागपूरहुन चंद्रपूर कडे व तिथून 6.30 वाजता माता महाकाली महाकाली मंदिर येथे उपस्थित राहणार आहे. यावेळी नाम. सुधीरभाऊ मुनगंटीवार, उत्तरप्रदेशातून कशी विश्वनाथ बनारस चे पालकमंत्री रवींद्र जयस्वाल, यु. पी. चे शिक्षण मंत्री योगेंद्र उपाध्याय, वन व पर्यावरण राज्यमंत्री अरुण सक्सेना, तसेच कैलास खैर व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत ही शोभायात्रा मार्गक्रमण करणार आहे.#khabarkatta 

सायं. 7 वाजता छंद क्लब येथे कैलास खैर यांचा राम भजनाचा कार्यक्रम होणार आहे. या सोहळ्याला येण्यास आचार्य गोविंद देव गिरी महाराजांनी सहभाग दर्शवावा हि या सोहळ्यासाठी भाग्याची गोष्ट असल्याचे नाम. मुनगंटीवार यांनी सांगितले. तसेच रामायण या मालिकेतील भगवान राम, लक्ष्मण, माता सीता ची भूमिका साकार करणारे अभिनेते या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. या शोभायात्रेसाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती बघता वाहतूक व्यवस्थेत फेरबदल करण्यात आला आहे.#chandrapur 

ही शोभायात्रा एफ.डी.सी.एम बल्लारपुर येथुन विसापुरमार्गे राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय,चंद्रपुर-माता महाकाली मंदिर- गिरणार चौक-गांधी चौक-जटपुरा गेट-प्रियदर्शिनी चौक-चांदा क्लब ग्राउंड, चंद्रपुर पर्यंत काढण्यात येणार आहे. सदर शोभायात्रेमध्ये वाहतुकीला अडथळा होवु नये म्हणुन या मार्गावरील जड वाहतुक बंद करण्यात येत आहे.शोभायात्रा दरम्यान मोठ्या प्रमाणात जनसमुदायाची गर्दी होण्याची शक्यता आहे. सार्वजनिक ठिकाणी शांतता व सुव्यवस्था तसेच रहदारीस कुठलाही त्रास अथवा अडथळा निर्माण होऊ नये याकरीता दि. 29 मार्च रोजी 4 वाजतापासुन ते 10 वाजेपर्यंत वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येत आहे.

बामणी फाटा बल्लारपुर ते कामगार चौक, चंद्रपुर हा मार्ग जडवाहनांकरीता बंद राहील. यादरम्यान जड वाहतुकदारांनी गडचांदुर किंवा राजुराकडुन चंद्रपुर येण्यासाठी भोयगांव रोड-धानोरा फाटा-पडोली-चंद्रपुर या मार्गाचा अवलंब करावा. तसेच वरोरा, भद्रावती व चंद्रपुरकडुन गडचांदुर किंवा राजुरा जाण्यासाठी धानोरा फाटा-भोयगांव रोड-गडचांदुर या मार्गाचा अवलंब करावा. तसेच गोंडपिपरी व कोठारीकडुन चंद्रपुर येण्यासाठी पोंभुर्णा रोडचा अवलंब करावा.यानंतर महाकाली मंदिर पासुन सदर शोभायात्रा सुरू होवुन कस्तुरबा चौक मार्गे गांधी चौक-जटपुरा गेट-प्रियदर्शिनी चौक-चांदा क्लब ग्राउंड येथे कार्यक्रमस्थळी पोहचणार आहे. यावेळी शोभायात्रा दरम्यान सदर मार्गावर सर्व प्रकारची वाहने वाहतुकीकरीता बंद राहील.

Pages