आमदार बंटी भांगडीया यांना अटक करा - माजी आमदार अवीनाश वारजूकर...#Arrest MLA Bunty Bhangdia - Former MLA Avinash Warjukar - खबरकट्टा

खबरकट्टा

Reg.UAM No.MH08D0024084 खबरकट्टा फक्त न्यूज वेबसाईट नसून या माध्यमाच्या साहाय्याने सामाजिक, राजकीय, व्यासायिक, जाणिवेतून फक्त बातमी किंवा खबर याच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे व्यासपीठ - अभिषेक वांढरे, चंद्रपूर (एक वाचक) """जागरूक रहा : वाचत रहा""'



आमदार बंटी भांगडीया यांना अटक करा - माजी आमदार अवीनाश वारजूकर...#Arrest MLA Bunty Bhangdia - Former MLA Avinash Warjukar

Share This
खबरकट्टा/चंद्रपूर:

चिमूर येथील रहिवासी साईनाथ बुटके यांनी व्हाट्सअप व फेसबुकवर आमदार बंटी भांगडिया यांच्याविरोधात पोस्ट केली .असे समजून रागाच्या भरात कायदा हातात घेऊन भाजपच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन अश्लील भाषेत शिवीगाळ करीत साईनाथ बुटके यांच्या राहते घरी जाऊन बुटकेला मारहाण केली त्यांच्या पत्नी सोडवण्यासाठी गेली असता आमदार बंटी भांगडिया यांनी त्यांचे डोक्याचे केस पकडून हात पकडून वरतून घासत खाली आणले .

अशी तक्रार दाखल केल्यावरून पोलिसांनी भांदवी 143,147,149,452,323,345,294 , त्यानुसार गुन्हा दाखल केला. वरील प्रकरणात आमदार भांगडिया यांनी साईनाथ बुटके यांची पोलीस तक्रार न करता कायदा हातात घेऊन बुटके पती-पत्नीला मारहाण केली त्यानंतर आमदार बंटी भांगडिया यांनी ठिकठिकाणी फोन करून 500 ते 700 लोकांच्या जमाव पोलीस स्टेशनवर आणून चिमूर येथील कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केला. व प्रशासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला यापूर्वी सुद्धा अनेकदा आमदार बंटी भांगडिया यांनी पदाचा वापर करून सत्तेचा दुरऊपयोग करून कायदा व सुव्यवस्था बिघडण्याचा प्रयत्न केला आहे. आमदार महोदयांना अटक करण्यासाठी माननीय अध्यक्ष विधानसभा मुंबई यांची लवकरात लवकर अनुमती घेऊन अटक करावी व बाकी गुन्हेगारांना त्वरित अटक करावी.

तसेच सन 2017 च्या जिल्हा परिषद निवडणुकीत प्रचारक पोलिसाला लाथ मारणे व विधानसभा निवडणूक सन 2019 ला शंकरपूर येथे गाड्या आडव्या करून निवडणुकीत उभे असलेल्या विरोधी उमेदवाराला धमकीविणे व निवडणूक प्रचारात विरोधी उमेदवाराच्या मागे व कार्यकर्त्यांच्या मागे गाड्या लावणे आमदार भांगडिया यांनी राजस्थानमध्ये सुद्धा पोलिसांची हुज्जत बाजी केली होती .या प्रकारे दहशत तयार करणे असा प्रकार केलेला आहे. या संदर्भात गुन्हा दाखल झालेला आहे. करीता मा.उपविभागीय पोलिस अधिकारी आयुष नोपाणी यांना 14 मार्च ला माजी मंत्री तथा सरचिटणीस महारष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी मा. आ.डॉ.अविनाशभाऊ वारजूकर, यांच्या उपसथितीमध्ये निवेदन देण्यात आले .

या,वेळी समन्वयक चिमूर विधनसभा डॉ. सतिशभाऊ वारजुकर,महाराष्ट्र प्रदेश सेवादल सरचिटणीस प्रा. राम राऊत सर, तालुका अध्यक्ष विजयजी गावंडे पाटील, शहर अध्यक्ष अविनाश अगडे, तालुका सचिव विजयजी डाबरे,सेवादल तालुका अध्यक्ष किशोरजी शिंगरे,प्रदीप तर्वेकर,जेष्ठ नेते धनराज मालके, माधवजी बिरजे, कदीर शेख,ओम भाऊ खैरे,विलास डांगे, रहेमान पठान,पप्पू शेख,अशोक दूधनकर, विलास पिसे,दीपक कुंभारे, घनश्याम रामटेके,राजू दांडेकर, बबलू शेख,सुभाष बन्सोड, नितीन कटारे, राकेश साटोणे,संतोष भैसारे,अक्षय लांजेवार,व कांग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Pages