खबरकट्टा/चंद्रपूर:
एच3एन2 एन्फ्लूएन्झा व्हायरसमुळे एका 78 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाल्याचे नागपुरात आज उघड झाल्याने आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे. सततचे ढगाळ वातावरण, पाऊस, घरोघरी सर्दी, खोकल्याचे रुग्ण वाढले आहेत अशात देश पातळीवर आरोग्य यंत्रणेची चिंता वाढविणाऱ्या व्हायरल इन्फेक्शनने उपराजधानीत पहिला पहिला बळी गेल्याने शहरातील आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली आहे.#khabar katta
दरम्यान, ‘डेथ ऑडिट’ झाल्यानंतरच या मृत्यूची तशी नोंद होणार असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले. 9 मार्च रोजी मृत्यू झालेल्या या 78 वर्षीय रुग्णाची टेस्ट मंगळवारी पॉझिटिव्ह आली. शहरातील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर सुरुवातीला उपचार सुरू होते. रुग्णाला ‘क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह एच3एन2’ म्हणून पल्मोनरी डिसीज’ (सीओपीडी) यासोबतच मधुमेह, उच्च रक्तदाबासारख्या सहव्याधी होत्या अशी माहिती मिळाली.