कोरोना, न्यायालयीन प्रकरण आणि अन्य कारणांमुळे प्रलंबित असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील 12 कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुका येत्या 28 एप्रिलला होईल. यावेळी प्रथमच सहकारी संस्थासह सरपंच आणि सदस्यांनाही मतदानाचा हक्क बजाविण्याची संधी मिळाली. आहे. त्यामुळे निवडणुका चुरशीच्या होणार आहे.#khabarkatta
बाजार समित्यांमध्ये वर्चस्व राहावे यासाठी सर्वच प्रमुख राजकीय पक्ष मैदानात उतरणार आहे. जिल्ह्यातील 12 कृषी उत्पन्न बाजार समित्यांची निवडणुक होईल. यात चंद्रपूर, मूल, ब्रह्मपुरी, भद्रावती, राजुरा, कोरपना, पोंभुर्णा, गोंडपिपरी, नागभीड, सिंदेवाही, चिमूर आणि वरोरा या बाजार समित्यांचा समावेश आहे. यावर्षी प्रथमच बाजार समित्यांच्या निवडणुकीत मतदार म्हणून सरपंच व मंगळवारी सदस्यांनाही संधी मिळणार असल्याने ग्रामीण भागातील राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे. बाजार समित्यांची मुदत संपूनही निवडणूका न झाल्याने 12 बाजार समित्या प्रशासकांच्या हाती होत्या. मंगळवारी राज्य सरकार निवडणूक प्राधिकरणाचे सचिव डॉ. पी.एल. खंडागळे यांनी निवडणूक कार्यक्रमाचा आदेश जारी केला.#chandrapur
त्यानुसार जिल्हा उपनिबंधक प्रशासकीय कार्यवाही पूर्ण करून या आदेशाला अनुसरून स्थानिक स्थितीप्रमाणे जिल्ह्याचा निवडणूक कार्यक्रम अंतिम मंजुरीनंतर जाहीर करणार आहेत. मतदारांचे सहकारी. माथाडी, हमाल, अशाप्रकारचे वेगवेगळे संवर्ग आहेत. त्यात आता सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचीही भर पडली. चंद्रपूर जिल्ह्यात 26 मार्चला काही सेवा सहकारी संस्थांच्या निवडणुका आहेत. ही निवडणूक आटोपल्यानंतर मतदाराची पुरवणी यादी तयार करून अंतिम यादी प्रकाशित केली जाणार असल्याचे समजते.
