खबरकट्टा/चंद्रपूर:
वढोली गोंडपिपरी येथील वनविभागाच्या काष्ट आगाराजवळ असलेल्या वनतलावात मासेमारीकरिता गेलेल्या 38 वर्षीय तरुणाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना शनिवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली. मृतकाचे नाव देविदास बंडू मडावी असून, तो गोंडपिपरी येथील भगतसिंग वार्डाचा रहिवासी आहे.#khabarkatta
देविदास मडावी हा आपल्याच वॉर्डातील एका सहकारी मित्रासोबत अधूनमधून मासे पकडण्यासाठी वनतलावात जात होता. दरम्यान, शनिवारीदेखील तो मासेमारीसाठी आपल्या सहकाऱ्यांसोबत तलावावर गेला. तिथे त्यांनी तलावात मासे पकडण्याकरिता जाळेदेखील टाकले. काही वेळानंतर त्याचा सहकारी हा पाण्याबाहेर निघाला. बऱ्याच वेळानंतर खोलवर पाण्यात गेल्यामुळे देविदास मडावी हा तलावामधून बाहेर निघालाच नाही. यातच सहकाऱ्याला शंका आली.
त्यांनी तलावाकडे जाऊन पाहिले असता देविदास कुठेच दिसला नाही. त्यामुळे घाबरलेल्या त्याच्या मित्राने या घटनेची माहिती कुटुंबीय व गावातील लोकांना दिली. लगेच काही मंडळी तलावाकडे गेली असता त्यांना देविदास मडावी याचा मृतदेह तलावानजीक काठावरील पाण्यात दिसला. गोडपीपरीचे ठाणेदार जीवन राजगुरू आपल्या पोलिस सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. पुढील तपास ठाणेदार जीवन राजगुरू करीत आहेत. देविदासच्या मागे आई- वडील, भाऊ असा आप्तपरिवार आहे.# khabarkatta Chandrapur
A 38-year-old youth tragically drowned while fishing in a forest lake near Kashta Agar of the forest department in Wadholi Gondpipari. This incident happened on Saturday around 2 pm. The deceased has been identified as Devidas Bandu Madavi and is a resident of Bhagat Singh Ward in Gondpipari.# khabarkatta
Devidas Madavi along with one of his ward colleagues would occasionally go to the forest lake for fishing. Meanwhile, on Saturday too, he went fishing on the lake with his colleagues. There too they cast nets in the lake to catch fish. After some time his colleague came out of the water.
As Devidas did not come out of the Madavi lake after a long time, he went into deep water. The colleague had doubts about this When they went to the lake and looked, Devidas was nowhere to be seen. His friend, who was frightened, informed the family and the people of the village about the incident.
Immediately when some people went to the lake, they saw the dead body of Devidas Madavi in the water on the bank of the lake. Thanedar Jeevan Rajguru of Godpipari reached the spot along with his police colleagues. Further investigation is being conducted by Thanedar Jeevan Rajguru.# khabarkatta